पशुसंवर्धन विभागाकडून शेड अनुदानासाठी ऑनलाइन पध्दतीने अर्ज करण्याचे आवाहन..!


एरंडोल:येथील पशुसंवर्धन विभागाकडून ग्रामीण भागासाठी नावीन्य पूर्ण योजना सन २०२१-२०२२ अंतर्गत दुधाळ गट,शेळी गट तसेच १००० मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या शेड साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सदरील अर्ज हे पशुसंवर्धन खात्याने दिलेल्या या https://ah.mahabms.com संकेतस्थळावर किंवा AH-MAHABMS या अँप वर मोबाईल द्वारे ही भरता येणार आहेत.त्याची मुदत ही ४ डिसेंबर २०२१ ते १८डिसेंबर २०२१ अशी आहे.
ग्रामीण भागातील सर्वसाधारण,अनुसूचित जाती,महिला,सुशिक्षित बेरोजगार,दारिद्र्य रेषेखालील,बचत गटाच्या महिला इ.लाभार्थी अर्ज करू शकतील.
अधिक माहिती साठी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क करावा व मुदतीत अर्ज व कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने अपलोड करावीत. सदरील अर्ज काही शंका किंवा अडचणी असल्यास टोल फ्री क्रमांक १९६२ किंवा १८००-२३३-०४१८ वर संपर्क करावा असे आवाहन एरंडोल येथील डॉ.अशोक महाजन- पशुधन विकास अधिकारी (वि),पंचायत समिती एरंडोल यांनी केले आहे

Comments (0)
Add Comment