पुणे :- अनुप फंड | विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे गु.र. क्र २१७/२०२१ भा. द. वि कलम ३६३,३८७,४५२,३२४,५०६,३४ प्रमाणे दि.०५/१२/२०२१ रोजी गुन्हा दाखल असून तक्रारदार निलेश तुळशीराम अहिरराव वय २२ वर्ष, धंदा – व्यवसाय, राहणार सिद्धार्थनगर ,धानोरी, पुणे यास दिनांक ०४/१२/२०२१ रोजी दुपारी ०४:३० वाजेच्या सुमारास घरी असताना त्यांचे ओळखीची मुले यांचे नाव १) अभिजीत पाखरे २) श्रीशल्य मस्के ३) हर्षल गुंजाळ ४) शेखर लोंढे हे तक्रारदार यांच्या घरात घुसून त्यांनी निलेश अहिरराव यास तुला जर पोह्याची गाडी लावायची असेल तर आम्हाला महिन्याला ६ हजार रुपये खंडणी द्यावी लागेल असे म्हणाले त्यावेळी तक्रारदार यांनी त्यांना पैसे देण्यास नकार दिला त्यावेळी त्यांनी तक्रारदार यास घरातून उचलून कार मध्ये घालून हडपसरच्या पुढे निर्जन स्थळी घेवून गेले तेथे त्यांनी तक्रारदार यास मारहाण केली व त्यास तु आम्हाला पैसे दिले तर सोडू, जर तू पैसे दिले नाही तर तुला पुन्हा घरातून उचलून आणू अशी धमकी दिली व सोडून दिले तक्रारदार यांनी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे वरील व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने लागलीच विजय शिंदे साहेब पोलीस निरीक्षक पुणे पुणे शहर व सचिन निकम साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पुणे यांनी तपास पथकातील अंमलदार यांची टीम तयार करून अमलदार पोहवा दीपक चव्हाण व अमलदार पोशि प्रफुल मोरे यांना वरील आरोपी यांचा शोध घेण्याकमी पाठविले असता त्यांनी तांत्रिक विश्लेषनाद्वारे सदर आरोपी यांचा शोध घेऊन सदरचे आरोपी हे वाघोली, केसनंद येथे शिवनेरी हॉटेलच्या पाठीमागे असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी सदर ठिकाणी जाऊन त्यांना ताब्यात घेऊन त्यांची नावे पत्ते विचारली असता त्यांनी त्यांची नावे १)अभिजित दत्ता पाखरे वय २४ वर्षे, राहणार आकाश पार्क, सर्वे नंबर २९, धानोरी, पुणे २) श्रीशल्य सोमनाथ मस्के वय २० वर्षे, राहणार प्रजासत्ताक कॉलनी, मुंजबावस्ती, धानोरी, पुणे ३) हर्षल शरद गुंजाळ वय १६ वर्षे, राहणार हंसनगर, भैरवनगर, धानोरी, पुणे ४) शेखर पांडुरंग लोंढे वय १७ वर्षे, राहणार चौधरीनगर, भैरवनगर, धानोरी, पुणे यांना ताब्यात घेऊन त्यांचे पालक यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई नामदेव चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, रोहिदास पवार, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ४, पुणे शहर, रमेश गलांडे सहा.पोलीस आयुक्त खडकी विभाग, विजयकुमार शिंदे पो नि गुन्हे सपोनि सचिन निकम, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अमालदर दीपक चव्हाण, यशवंत किर्वे, प्रफुल मोरे, शेखर खराडे, संदीप देवकाते, शिवाजी गोपनर, योगेश चांगन व विशेष पोलीस अधिकारी राज राठोड (पी -४ महाराष्ट्र राज्य) यांच्या पथकाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे