कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर कोणाच्या सांगण्यावरून वाढवले?; मोदी सरकारवर प्रश्नांचा भडिमार

हायलाइट्स:

  • कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतरावरून वाद
  • तज्ज्ञ समितीच्या खुलाशानंतर विरोधकांचा मोदी सरकारवर प्रश्नांचा भडिमार
  • आता तरी इतरांचा सल्ला ऐका; नाना पटोले यांचा टोला

मुंबई:कोविशिल्ड लसीच्या (Covishield Vaccine) दोन डोसमधील अंतरावरून सध्या मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. दोन डोसमधील अंतर वाढवण्याची शिफारस तज्ज्ञांच्या समितीनं केलीच नव्हती असं आता समोर आलं आहे. त्यावरून विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरलं आहे. ‘मोदी सरकारनं हा निर्णय नेमका कोणाच्या सांगण्यावरून व कशाच्या आधारावर घेतला याचा खुलासा झाला पाहिजे,’ अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसनं केली आहे.

कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर ६ ते ८ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय १३ मे रोजी सरकारने घेतला. हा निर्णय तज्ञ गटाच्या शिफारशीवरून घेतल्याचे सांगितलं गेलं होतं. मात्र, तशी शिफारस केलीच गेली नव्हती असं तज्ज्ञ गटातील शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. त्यावरून नवा वाद सुरू झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी या गोंधळावर भाष्य करताना मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

वाचा:मराठा आरक्षण आंदोलन सुरू असताना संजय राऊतांचं मोठं विधान

‘दोन लसीमधील अंतर वाढवण्याचा निर्णय फक्त कोविशिल्ड लसीबद्दलच का घेतला गेला? लसींच्या तुडवड्यामुळे लसीकरण केंद्रे बंद करण्याची वेळ आली आणि त्यामुळं मोदींची प्रतिमा मलीन होऊ नये म्हणून हा सारा खटाटोप केला आहे का? लसीकरण मोहिमेत मोदी सरकारला आलेलं अपयश झाकण्यासाठीच हा निर्णय घेतला नाही ना,’ असा सवाल पटोले यांनी केला आहे.

वाचा: ‘आरक्षणाबद्दल मोदींच्या मनात काय आहे हे कळायला हवं’

‘लसीमुळे करोनापासून होणारा धोका कमी होण्यास मदत होते असं अनेक तज्ञांनी सांगितलं आ,हे परंतु मोदी सरकारकडं लसीकरणाचं राष्ट्रीय धोरणच नाही. लसींची आवश्यक मागणी लस उत्पादक कंपन्याकडं न करताच आधी ४५ वर्षांवरील आणि नंतर १८ वर्षावरील लोकांना लस देण्याचा निर्णय घेतला. परंतु राज्य सरकारकडं लसींचा पुरवठा योग्य त्या प्रमाणात केला गेला नाही. दोन कंपन्यांवरच विसंबून राहिल्यानं लसीकरण मोहीम फसली. घरोघरी जाऊन लस द्यावी असं उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला सांगितलं होतं. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांनीही सर्वांना मोफत लस देण्यासंदर्भात मोदी सरकारला पत्र पाठवून सल्ला दिला होता. त्यांच्या सल्ल्याकडे मोदींनी दुर्लक्ष केले, आतातरी त्यांचा सल्ला ऐकून लोकांचे जीव वाचवा, असं आवाहन पटोले यांनी केलं आहे.

वाचा: लघुशंकेसाठी थांबलेल्या ग्रामपंचायत सदस्यावर गोळीबार

Source link

congress targets modi governmentGap Between Covishield VaccineGap Between Covishield Vaccine dosesModi governmentNana Patoleकरोनाकोविशिल्डनाना पटोले
Comments (0)
Add Comment