reservation in promotion आरक्षण: झारीतील शुक्राचार्यांचे पितळ उघडे पाडणार; ऊर्जामंत्री राऊत यांचा संकल्प

हायलाइट्स:

  • पदोन्नीतील आरक्षणावर मी २१ जूननंतर माझी भूमिका मांडणार- ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत.
  • पदोन्नतीतील आरक्षण थांबवणाऱ्या झारीतील शुक्राचार्यांचे पितळ उघडे पाडणार- ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत.
  • आरक्षणाबाबत राज्यातील जनतेच्या मनात अस्वस्थता आहे- डॉ. नितीन राऊत.


मुंबई: पदोन्नतीतील आरक्षण थांबवून अनसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्याविमुक्त जाती आणि बहुजन मागास समाजाला वेठीस धरणारे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत?, असा सवाल करताना या शुक्राचार्यांचे पितळ उघडे पाडण्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिला आहे. पदोन्नतीतील आरक्षणावर येत्या २१ जूनंतर आपण बोलणार असून या मुद्द्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढू, असा संकल्पही राऊत यांनी केला आहे. (i will speak on reservation in promotion after june 21 said energy minister dr nitin raut said)

आरक्षणाबाबत राज्यातील जनतेच्या मनात अस्वस्थता आहे. मी मराठवाड्याचा दौरा करत असताना याचा अनुभव आपल्याला आला. लोक मला ठिकठिकाणी भेटून आरक्षण या विषयावर विचारू लागले आहेत, असे राऊत यांनी सांगितले.

मराठा समाजाच्या आरक्षणाला आम्ही पूर्णपणे समर्थन दिलेले आहे. असे असले तरी मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकार अपयशी ठरत असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे आणि ते योग्य नाही. ज्यांनी हे चित्र निर्माण केले आहे, त्यांचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही, असा संकल्पच डॉ. राऊत यांनी केला आहे.

क्लिक करा आणि वाचा- करोना: राज्यात आज १०,१०७ नव्या रुग्णांचे निदान; १०,५६७ झाले बरे, मृत्यू २३७

भारतीय राज्यघटनेने ज्यांना आरक्षण दिलेले आहे, अशांना ते मिळणार नाही यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचे आरक्षण संपवण्यात आले. ओबीसी, अनुसूचित जाती आणि जमाती, भटक्या विमुक्त जाती यांचे पदोन्नतीतील आरक्षण थांबवले गेले. याचे समर्थन केले जाणार नाही. हे लक्षात घेत २१ जूनला न्यायालयाचा निकाल येईपर्यंत मी थांबलो आहे. त्यानंतर मी बोलणार आहे, असे डॉ. राऊत म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- नागपुरात अफगाणी नागरिक अटकेत; तालिबानी दहशतवाद्यांच्या समाजमाध्यमांना करत होता फॉलो

आरक्षणाच्या विषयावर माझी लोकांशी चर्चा सुरू झालेली आहे. मी मराठावाड्याच्या दौऱ्यानंतर आता विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. या दौऱ्यादरम्यान मी आरक्षण या विषयावर दाद मागणार आहे, असेही राऊत पुढे म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- शिवसेनेने औरंगजेबी वृत्ती दाखवली; आशीष शेलार यांची घणाघाती टीका

Source link

dr. nitin rautEnergy minister Dr Nitin RautReservation in Promotionझारीतील शुक्राचार्यडॉ. नितीन राऊतपदोन्नतीतील आरक्षण
Comments (0)
Add Comment