कासोदा पोलीस स्थानकात वाळुमाफीयांची मुजोरी,पळवण्यात आले रेतीचे डंपर..!



एरंडोल: तालुक्यातील कासोदा पोलीस स्थानकात वाळुतस्करीप्रकरणी डंपरचालकाची चौकशी होत असतांना त्याच्या दुसर्या सहकार्याने पोलिस स्टेशन च्या आवारातुन वाळुने भरलेले डंपर पळवुन नेत पोबारा केला.
हि घटना १९ डिसेंबर २०२१ रोजी मध्यराञी १:००वाजेच्या सुमारास घडली.
वाळुमाफीयांची तालुक्यात वाढत चाललेल्या मुजोरीला आळा घालणे यंञणांच्या आवाक्याबाहेरचे आहे की काय..?
असा सूर जनमानसात उमटत आहे.
दरम्यान..
५लाखांच्या डंपरसह सुमारे १२हजार रूपये किंमतीची ३ब्रास वाळु जप्त करण्यात आली असुन आरोपी गगन छगन तडवी वय-२० वर्षे रा.मोलगी ता.अक्कलकुवा हल्ली मु. निलॉन्स कंपनी कॉलनी, उञाण व अमिन हुसेन शेख रा.उञाण यांच्याविरूध्द कासोदा पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१९रोजी राञी पारोळा फरकांडे चौफुलीवर पोलिस उपनिरीक्षक नरेश ठाकरे,पोलिस काँन्स्टेबल भागवत पाटील,इमरान खान,नितीन मनोरे,स्वप्निल परदेशी हे राञी गस्तीवर असतांना अवैध वाळु वाहतुक करीत असलेला एम.एच.२० सी. टी.९२८४ क्रमांकाचा डंपर आढळुन आला असता चौकशी केल्यावर उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली म्हणून डंपर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला.
तपासकामी गगन तडवी याची चौकशी सूरू असताना त्याचा साथीदार अमिन हुसेन शेख याने पोलीसस्थानकाच्या आवारातुन जमा करण्यात आलेला डंपर पळवुन नेला व तळई रस्त्यावर हॉटेल सत्कार समोरील बेकरीच्या मागील बाजुस डंपरमधील वाळु खाली करीत असतांना त्याठिकाणी कासोदा पोलीस पोहोचत असल्याचे पाहुन अमिन याने डंपर घेऊन पळ काढला.
तद्नंतर..कासोदा पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल होऊन गगन छगन तडवी याला अटक करण्यात आली तर दुसरा आरोपी अमिन शेख हा फरार असुन पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
याप्रकरणी सपोनी निता कायटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नरेश ठाकरे हे पुढील तपास करीत आहेत.

Comments (0)
Add Comment