एरंडोल बसस्थानकावरून दिड महीन्यानंतर पोलिस बंदोबस्तात निघाली लालपरी..!



एरंडोल: १महीना १६ दिवसानंतर २३ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी पहील्यांदाच एस-टी गाडी भडगाव साठी सोडण्यात आली.
विशेष हे की, पहील्या बसमध्ये पहील्याच दिवशी १७ते१८ प्रवासी बसले होते.
भडगाव व जळगाव च्या प्रत्येकी २ फेर्या तसेच धरणगाव च्या ६ फेर्या अश्या एकूण १० फेर्यांद्वारे लालपरीची चाके रस्त्यांवरून फिरली.

दरम्यान..
आणखी एक कर्मचारी गुरूवारी कामावर परतला आहे.
त्यामुळे कर्तव्यावर रूजू झालेल्या कर्मचार्यांची संख्या १४ पर्यंत पोहोचली आहे.
गुरूवारी राञीपर्यंत आणखी काही कर्मचारी कामावर परतण्याची शक्यता एरंडोल बसआगार प्रशासनातर्फे वरतविण्यात आली आहे.
आतापर्यंत ४चालक,८वाहक,१ कार्यशाळा कर्मचारी तर १सफाई कामगार याप्रमाणे कर्मचारी रूजू झाले आहेत.

प्रवाश्यांनी पुर्ववत एस-टी ने सुरक्षित प्रवास करून राज्य परीवहन महामंडळास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments (0)
Add Comment