३१ डिसेंबर​​ रोजी रस्ता, वाहतूक सुरक्षा जनजागृतीसाठी मास्क आणि चॉकोलेट वाटप

भारती विद्यापीठ आय.एम.ई.डी. विद्यार्थ्यांचा उपक्रम

पुणे,दि.३१ :-जुन्या वर्षाला निरोप देवून नव्या वर्षाचे स्वागत करण्याच्या ​३१ डिसेंबर या दिवशी भारती विद्यापीठ ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आय.एम.ई.डी.) च्या वतीने​ कुलगुरू डॉ.माणिकराव साळुंखे यांच्या उपस्थितीत ​ ‘रस्ता सुरक्षा जनजागृती अभियाना’,कोविड सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

या अभियानातंर्गत महाविद्यालयाच्या पौड रस्ता कॅम्पस मध्ये आणि परिसरात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी,प्राध्यापकांनी मास्क, वाहतुक सुरक्षा विषयी संदेश असलेल्या शुभेच्छा पत्रांचे आणि चॉकलेटचे वाटप केले.कुलगुरू डॉ.माणिकराव साळुंखे,कुलसचिव जी.जयकुमार,डॉ विजय फाळके,डॉ.अजित मोरे, डॉ.प्रमोद पवार, डॉ.सुचेता​ कंची​, प्रा.श्रेयस डिंगणकर उपस्थित होते.​सोनाली​ भूषण ​,सिध्दां​र्थ सिंग ,नेहा​ मोहिते ​ या ​विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नियोजन केले. सोशल मीडिया द्वारे देशभर १ लाख नागरिकांपर्यंत रस्ता सुरक्षा,कोविड सुरक्षेचे संदेश पोहोचविले गेले .डॉ सचिन वेर्णेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दर वर्षी वाहतूक आणि रस्ते सुरक्षा विषयक जागृती महाविद्यालयातर्फे आयोजित केली जाते. या उपक्रमाचे हे नववे वर्ष आहे.

Comments (0)
Add Comment