Coronavirus In Dharavi मोठी बातमी: धारावी करोनामुक्तीच्या उंबरठ्यावर; उरलेत फक्त सहा रुग्ण

हायलाइट्स:

  • धारावीत आता फक्त ६ सक्रिय रुग्ण उरले.
  • गेल्या २४ तासांत एका नवीन रुग्णाची भर.
  • दादर, माहीममधील स्थितीही नियंत्रणात.

मुंबई: मुंबईतील सर्वात दाट लोकवस्तीचा भाग असलेली धारावी करोनामुक्तीच्या उंबरठ्यावर असून धारावीत आता करोनाचे केवळ सहा सक्रिय रुग्ण उरले आहेत. धारावीत गेल्या २४ तासांत फक्त एका नवीन रुग्णाची भर पडली आहे. ( Coronavirus In Dharavi Latest Update )

वाचा: ‘शिवसेना-राष्ट्रवादीने एकत्र लढावे ही महाराष्ट्रातील जनतेचीही इच्छा!’

ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीच्या जोरावर धारावीने करोना संसर्गाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत थक्क करणारी कामगिरी केली आहे. मुंबई महापालिकेने नियोजनबद्धपणे स्थिती हाताळत धारावीत करोना नियंत्रणात आणण्याचे आव्हान लिलया पेलले आहे. धारावीत करोनाने शिरकाव केल्यानंतर इतक्या दाट लोकवस्तीत कोविड नियम कसे अमलात आणले जाणार, हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी कोणत्याही प्रकारे गोंधळ होऊ न देता उपाययोजना केल्या व जबाबदाऱ्यांचे वाटप केले. त्या जोरावरच धारावीने पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही करोनाशी नेटाने लढा दिला आहे.

वाचा: राम मंदिरासाठीच हा निधी खर्च होतोय ना?; राष्ट्रवादीने केली ‘ही’ मागणी

मुंबई महापालिका क्षेत्रात करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असताना त्यात धारावीने आघाडी घेतली आहे. धारावीत सलग दोन दिवस केवळ एकेकच नवा रुग्ण आढळला असून आता केवळ सहा सक्रिय रुग्ण उरले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्याआधी १४ आणि १५ जून रोजी धारावीत करोनाचा नवा एकही रुग्ण आढळला नव्हता. धारावीत आतापर्यंत करोनाचे एकूण ६ हजार ८६३ रुग्ण आढळले असून त्यातील ६ हजार ४९८ रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.

दादरमध्ये दोन तर माहीममध्ये १० नवे रुग्ण

धारावीलगतच्या दादर आणि माहीममध्येही हळूहळू करोना स्थिती नियंत्रणात येत आहे. गेल्या २४ तासांत दादरमध्ये नव्याने दोन रुग्णांची भर पडली असून माहीममध्ये १० नवे रुग्ण आढळले आहेत. दादरमध्ये आता १४० सक्रिय रुग्ण आहेत तर माहीममध्ये ही संख्या १०१ इतकी आहे.

वाचा: एनआयएने अटक केल्यानंतर प्रदीप शर्मा यांनी केला ‘हा’ गंभीर आरोप

Source link

coronavirus in dharavicoronavirus in dharavi latest newscoronavirus in dharavi latest updatecoronavirus in mumbai latest newsCoronavirus in Mumbai Updateइक्बालसिंह चहलदादरधारावीमुंबईमुंबई महापालिका
Comments (0)
Add Comment