मुंबईतून २१ वर्षीय तरुणाला १० पिस्तूलांसह अटक, संपूर्ण कुटुंबच करतं होतं धक्कादायक व्यवसाय

हायलाइट्स:

  • मुंबईतून २१ वर्षीय तरुणाला १० पिस्तूलसह अटक
  • संपूर्ण कुटुंबाच करतं धक्कादायक व्यवसाय
  • गुन्हे शाखेच्या युनिट 7 ची मोठी कारवाई

मुंबई : मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 7 ने शस्त्राचा साठा करण्यासाठी मुंबईत आलेल्या एका व्यक्तीला अटक केली आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांची आवक ही आता यंत्रणांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. गुन्हे शाखेचे डीसीपी अकबर पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलुंड भागात एक व्यक्ती मोठ्या प्रमाणात शस्त्रे घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट 7 चे प्रभारी मनीष श्रीधनकर यांच्या पथकाने सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतलं.

लखनसिंग चौहान असं अटक केलेल्या युवकाचं नाव असून त्याचं वय अवघ्या 21 वर्षे आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या आरोपीवर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या वर्षीही गुन्हे शाखेने बंदुकीसह एकाला अटक केली होती. पण त्यावेळी तो पोलिसांच्या तावडीतून निसटला.

पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासणी वेळी चौहान हा मध्य प्रदेशातील बरुवानी जिल्ह्यातील रहिवासी असून त्या जिल्ह्यात असे एक गाव आहे जिथे बहुतेक लोक शस्त्रे बनवण्याचे काम करतात, अशी माहिती पठाण यांना मिळाली. शस्त्रे बनवणे आणि वेगवेगळ्या राज्यात त्याची विक्री करणे हा चौहानचा कौटुंबिक व्यवसाय आहे.

लॉकडाऊन उघडलं म्हणून जिल्ह्याबाहेर जात असाल तर सावधान, अजित पवारांनी दिले संकेत
अधिक माहितीनुसार, पोलिसांना 10 पिस्तुल तसेच 12 मासिके आणि 6 लाईव्ह राऊंड्स मिळाल्या आहेत. चौहानकडे पिस्तूल विकत घेणाऱ्यांची मोठी लांबलचक यादीही पोलिसांना मिळाली आहे. त्याने चौकशी दरम्यान सांगितले की, तो एक पिस्तूल ३० हजारांना विकत असे.

गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितल्यानुसार, तो दरमहा 100 हून अधिक बंदूका बनवून मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात विक्री करत असे. दरम्यान, इतकी शस्त्रे विकायला तो कोणाकडे मुंबईकडे आला होता? याची गुन्हे शाखा चौकशी करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Source link

Madhya PradeshMumbai Crime Branchmumbai crime branch contact numbermumbai crime branch officers listMumbai news todaypistol gunpistol squatPistols
Comments (0)
Add Comment