कोथरूडयेथील देवयानी हॉस्पिटलमध्ये करोना रुग्ण असलेल्या महिलेला उपचारासाठी दाखल केल्यानंतर हातामधील एक लाख ३५ हजार रूपये किंमतीच्या बांगड्या चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचाः प्रताप सरनाईकांची मोदींशी पुन्हा जुळवून घेण्याची विनंती; सोमय्या म्हणतात…
याबाबत मोशी येथील ३८ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे इंजिनिअर असून ते कुटुंबासह मोशी येथे राहण्यास आहेत. त्यांच्या आईला करोनाची लागण झाल्यामुळे उपचारासाठी त्यांना २४ एप्रिल रोजी देहुगाव येथील हॉस्पिटलमध्ये ऍडमीट केले होते. पण, त्या ठिकाणी अधुनिक सुविधा नसल्यामुळे तक्रारदार यांच्या आईला १३ मे रोजी कोथरूड येथील देवयानी हॉस्पिटलमध्ये ऍडमीट केले होते.
वाचाः नागपूर सुपर स्पेशालिटीमध्ये रुग्णाची आत्महत्या; तिसऱ्या मजल्यावरून घेतली उडी
या हॉस्पिटलमध्ये आयसीयू विभागात तक्रारदार यांच्या आईला दाखल केले होते. त्यावेळी आयसीयूमधील नर्सनं तक्रारदार यांना त्यांच्या आईची दोन कर्णफुले, चार सोन्याच्या बांगड्या आणून दिल्या. पण, तक्रारदार यांची आई नेहमी हातामध्ये सहा बांगड्या घालत असल्याचे त्यांना माहिती होते. त्यामुळे त्यांनी नर्स व डॉक्टरांना विचारणा केली. पण त्यांना समाधानकारक माहिती मिळाली नाही. तक्रारदार यांच्या आईची तब्बेत खूपच खराब होती. त्यामुळे त्यांनी देखील याप्रकरणाकडे जास्त लक्ष दिले नाही. २२ मे रोजी तक्रारदार यांच्या आईचे करोनामुळे निधन झाले. त्यानंतर तक्रारदार यांनी घरी बांगड्या पाहिल्या. तसेच, हॉस्पिटलमध्ये देखील चौकशी केली. पण, त्या सापडल्या नाहीत. त्यावेळी त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमीट केल्यानंतर बांगड्या चोरल्याची तक्रार पोलिसांकडे दिली आहे. याप्रकरणी अलंकार पोलिस अधिक तपास करत आहेत.
वाचाः नागपूर जेलमध्ये हाणामारी; एका कैद्याने कापडात दगड बांधला आणि…