तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख
कासेवाडी मध्ये एकाच दिवशी 2 सराईत गुन्हेगार 1 तडीपार असे 3 गुन्हेगार हत्यारासह युनिट 1 गुन्हे शाखे कडुन जेरबंद
पुणे शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये व जनतेच्या मालमतेचे रक्षण व्हावे तसेच कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडु नये म्हणुन पुणे शहरातील पोलीस अभिलेखावरील टोळीतील गुंड , दरोडा , जबरी चोरी , घरफोडी चो – या करणारे सराईत गुन्हेगार , यांचा शोध घेवुन त्यांचे हालचालीवर नजर ठेवुन त्यांचेविरुध्द कठोर कारवाई करणेबाबत वरिष्ठांकडून आदेश दिलेले असल्याने दिनांक – 19/06/2021 रोजी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नाईक अमोल पवार यांना मिळालेल्या गोपनीय बातमी नुसार सध्या तडीपार असलेला रेकॉर्ड वरिल गुन्हेगार सुरज उर्फ पाप्या जाधव हा पतसंस्थे जवळ कासेवाडी पुणे येथे उभा असल्याबाबत माहिती मिळाल्याने सुरज उर्फ पाप्या रमेश जाधव वय 22 वर्ष रा.कासेवाडी पुणे त्यास ताब्यात घेण्यात आले.
तर पोलीस हवालदार अजय थोरात यांना मिळालेल्या गोपनीय बातमी नुसार सध्या पॅरोलवर असलेला रेकॉर्ड वरिल गुन्हेगार रवी कोळी हा कोयता घेऊन कामगार तरुण मंडळा जवळ कासेवाडी पुणे येथे उभा असल्याबाबत माहिती मिळाल्याने रवी मनोज कोळी वय 22 वर्ष रा. कासेवाडी पुणे यास लोखंडी कोयत्यासह पकडण्यात आले.
तसेच पोलीस शिपाई तुषार माळवदकर यांना मिळालेल्या गोपनीय बातमी नुसार रेकॉर्ड वरिल गुन्हेगार आझिम शेख हा गुप्ती घेऊन 10 नंबर कॉलनी जवळ पार्किंग मध्ये कासेवाडी पुणे येथे उभा असल्याबाबत माहिती मिळाल्याने आझिम सलीम शेख वय 23 वर्ष रा. कासेवाडी पुणे यास लोखंडी गुप्तीसह पकडण्यात आले असल्याने सदर आरोपी कडुन 1 कोयता व 1 गुप्ती जप्त करुन खडक पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत व त्यांना पुढील तपासासाठी खडक पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलेले आहे .
सदर आरोपीवर जबरी चोरी, घरफोडी , चोरी , वाहनचोरी प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी गुन्हे शाखा पुणे शहरचे अपर पोलीस आयुक्त श्री . अशोक मोराळे , पोलीस उप आयुक्त , गुन्हे , श्री . श्रीनिवास घाडगे , सहायक पोलीस आयुक्त गुन्हे . १ श्री . सुरेन्द्र देशमुख यांचे मार्गदशनाखाली युनिट – १ गुन्हे शाखा , पुणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री . भरत जाधव , युनिट – १ गुन्हे कडील पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड , सुनिल कुलकर्णी , पोलीस अंमलदार अजय थोरात , अमोल पवार , इम्रान शेख , अय्याज दडडीकर , तुषार माळवदकर , महेश बामगुडे, विजेसिंग वसावे ,सचिन जाधव , दत्ता सोनावणे , शशीकांत दरेकर यांनी केली आहे.