Rajesh Tope: राज्यातील लसीकरणाबाबत मोठी बातमी; आरोग्यमंत्र्यांनी केली ‘ही’ घोषणा

हायलाइट्स:

  • राज्यातील लसीकरणाबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी.
  • १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे उद्यापासून लसीकरण.
  • लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी सरकारचा निर्णय.

मुंबई: करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचे संकट घोंगावत असतानाच लसीकरणाला वेग देण्यासाठी युद्धपातळीवर पावले टाकण्यात येत आहेत. याबाबत राज्य सरकारकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली असून १८ वर्षांवरील नागरिकांची लसीकरणाची प्रतीक्षा आता संपणार आहे. ( Covid Vaccination In Maharashtra Latest Update )

वाचा:रत्नागिरीत डेल्टा प्लस व्हेरिएंट?; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती

महाराष्ट्र राज्य कोविड लसीकरण मोहिमेत सातत्याने आघाडीवर राहिलं आहे. मर्यादित लस पुरवठा लक्षात घेत गेले काही दिवस १८ ते ४४ या वयोगटाचे सरसकट लसीकरण न करता मध्यममार्ग काढून ३० ते ४४ वयाच्या नागरिकांना लस देण्यात येत होती. यात आता पुढचं पाऊल टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली.

वाचा: मुंबई आता लेव्हल १ मध्ये असली तरी…; निर्बंधांबाबत पालिकेने जारी केला आदेश

राज्यातील कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला वेग द्यायचा असल्याने १८ वर्षांवरील सर्व वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला राज्य सरकार मान्यता देत आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले. प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्यातील लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे असे आवाहन मी महाराष्ट्रातील तरुणाईला करत आहे, असेही टोपे म्हणाले. राज्यात आता १८ वर्षांवरील लसीकरण शक्य आहे. त्याप्रमाणात लससाठा उपलब्ध होत आहे, असेही टोपे म्हणाले. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील १८ ते ३० या वयोगटालाही खूप मोठा दिलासा मिळणार आहे.

वाचा: ठाकरे सरकार किती काळ टिकणार?; आता राष्ट्रवादीनेही स्पष्ट केली भूमिका

दरम्यान, १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण मोहिमेची जबाबदारी केंद्र सरकारने राज्य सरकारवर टाकली होती. मात्र, त्यात सुसूत्रता आणण्यासाठी लसीकरण धोरणात बदल करत संपूर्ण देशात केंद्र सरकार मार्फत १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचेही मोफत लसीकरण करण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. २१ जून रोजी योग दिनापासून हे मोफत लसीकरण सुरू करण्यात येईल असे मोदी यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार आजपासून नव्या धोरणानुसार लसीकरण सुरू झाले असून पहिल्याच दिवशी तब्बल ८० लाखांवर नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. ‘वेल डन इंडिया’ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यासाठी सर्वांना धन्यवाद दिले आहेत.

वाचा: करोनाच्या धोक्यानंतर आता मुंबईसमोर आणखी एक संकट

Source link

covid vaccination in maharashtracovid vaccination in maharashtra latest newscovid vaccination in maharashtra latest updatecovid vaccination in maharashtra updatesrajesh tope on covid vaccination in maharashtraकरोनाकोविड प्रतिबंधक लसीकरणनरेंद्र मोदीराजेश टोपेलसीकरण
Comments (0)
Add Comment