वाघ आणि गावकऱ्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री; ग्रामस्थासह १ जवान जखमी

हायलाइट्स:

  • तब्बल तीन वाघ गावात घुसले
  • वाघाच्या हल्ल्यात विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या एक जवानासह एक गावकरी जखमी
  • वाघांना पुन्हा जंगलात हुसकावून लावण्यात यश

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमधील पळसगाव येथे वाघाने केलेल्या हल्ल्यात विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या एका जवानासह एक गावकरी जखमी झाल्याची घटना घडली. या परिसरात आलेले सर्वच्या सर्व ३ वाघ आता जंगलात परतले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सदर घटना बुधवारी घडली आहे.

चिमूर तालुक्यातील पळसगाव येथे तलावाजवळ सकाळी ३ वाघ एकत्र फिरत होते. गावकऱ्यांना ही बाब बुधवारी सकाळी निदर्शनास आली. यावेळी एका वाघाने ग्रामस्थांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात चरणदास बनसोड (५६) हे जखमी झाले. या घटनेनंतर गावकऱ्यांनी एकत्र येत वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यात आधी दोन वाघांनी जंगलाचा रास्ता धरला आणि काही वेळानंतर तिसरा वाघही जंगलात निघून गेला.

‘विडी उद्योग वाचवा! कोरोनाने मरण्यापेक्षा न्याय हक्कासाठी मरण आले ते वीर मरण समजू’

स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या प्रकल्पाचे एसटीपीएफचे जवान सुनील गजेलवार यांच्यावरही वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. जखमी जवानाला उपचारासाठी चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, ही परिस्थिती पाहता वनविभागाने गावकऱ्यांना परिसरापासून बरेच लांब नेले होते, मात्र आता तीनही वाघ जंगलात गेल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे.

Source link

chndrapurTadoba and Andhari Tiger Reserveचंद्रपूरताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पवाघाचा हल्ला
Comments (0)
Add Comment