करोनाच्या संकटामुळे गेल्यावर्षी गणेशोत्सव मंडळांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. हे लक्षात घेत राज्य सरकार गणेशोत्सव मंडळांना मदत करण्यात भूमिकेत असेल आणि त्यादृष्टीने सरकार गणेशोत्सव साजरा करण्यावर बंधने आणणार नाही, अशी अपेक्षा गणेशोत्सव मंडळांनी व्यक्त केली आहे.
क्लिक करा आणि वाचा- करोना योद्ध्यांना कोल्हापूरकरांचा सलाम; झळकले कौतुकाचे फलक, पालकमंत्र्यांचा पुढाकार
मुख्यमंत्र्यांसोबत होणार बैठक
यंदाच्या गणेशोत्सवाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुंबई महानगरपालिका, पोलिस आणि गणेशोत्सव मंडळांची बैठक होणार आहे. या बैठकीत गणेशमूर्तीची उंची, गणेशोत्सवाचे नियम आणि इतर महत्वाच्या मुद्यांवर चर्चा होणार आहे.
क्लिक करा आणि वाचा- महामंडळ वाटपाचा मुद्दा ऐरणीवर; महाविकास आघाडीत मात्र मतभेद?
गणेशोत्सवाला अजून अडीच महिन्यांचा कालावधी असला तरी त्याची तयारी मात्र आतापासूनच सुरू झाली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना फार आधीपासूनच गणेशोत्सवाची तयारी करावी लागते. तसेच मूर्ती तयार करण्याचे कामही लवकर सुरू करावी लागते. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप, सजावट आदींच्या तयारीलाही आधीपासूनच लागावे लागते. असे असताना सरकारने नियमावलींबाबत अजूनही काहीही जाहीर न केल्यामुळे गणेशोत्सव मंडळांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
क्लिक करा आणि वाचा- ‘या’ जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका १९ जुलैला, २० जुलैला मतमोजणी
गणेशमंडळांच्या सूचना
> गणेशमूर्तीसाठी उंचीची मर्यादा नको.
> दर्शनासाठी सुरक्षेचे नियम पाळून परवानगी देण्यात यावी
> मंडप, ध्वनिक्षेपकासंदर्भातील परवाने ठरलेल्या धोरणानुसार वितरिक करा.
> श्रीगणेशाचे आगमन, मिरवणूक आणि गणेशमूर्तीचे विसर्जन याबाबत निश्चित धोरण ठरवावे.
> विसर्जनासाठी चौपाट्या खुल्या करण्यात याव्यात.
> गणेशोत्सव मंडळाच्या जागेत लसीकरणासाठी परवानगी द्यावी.
> मंडळाच्या कार्यकर्त्यांनी करोना विरोधी लशीचे दोन्ही डोस घेतलेले असावे.