नवनीत राणा यांचं आदित्य ठाकरेंना पत्र; म्हणाल्या, ‘वडिलांकडे हट्ट केल्यास काम मार्गी लागणार’

हायलाइट्स:

  • नवनीत राणा यांचं आदित्य ठाकरेंना पत्र
  • ‘वडिलांकडे हट्ट केल्यास काम मार्गी लागणार’
  • लाल फितीत अडकलेल्या विकासाला चालणा देण्याचा आग्रह

अमरावती : खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावरून सध्या राणा दाम्पत्य आणि शिवसेनेमध्ये खल सुरू आहे. अशातच खासदार नवनीत राणा यांनी विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदऱ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना लक्ष्य देवून लाल फितीत अडकलेल्या विकासाला चालणा देण्याचा आग्रह केला आहे. त्यासाठी वडिलांकडे हट्ट केल्यास काम मार्गी लागणार असल्याचा सल्लासुध्दा त्यांनी दिला आहे.

खासदर नवनीत राणा यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, चिखलदऱ्यात हजारो पर्यटक येतात. निसर्गाचा मनमुराद आनंद लुटतात. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात चिखलदरा येथे सिंगल केबलवरचा देशातील पहिला स्कायवॉक बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. सिडकोकडून त्याची उभारणी केली जात आहे. गोराघाट पॉइंट ते हरिकेन पॉईट दरम्यान ४०७ मीटर लांबीच्या या स्कॉयबॉकच्या उभारणीवर ३८ कोटी रुपये खर्च येणार आहे.
नवी मुंबई विमानतळ वाद: राज ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केल्यानंतरही मनसेचा आमदार आंदोलनात
जून २०२१ पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते पण त्याचे काम आज अर्धवट पडलेले आहे. या स्कायवॉकवर उभे राहुन पर्यटकांना चिखलदऱ्याचे अप्रतिम सौंदर्य न्याहाळता येईल. त्यावर असलेलया काचेच्या प्लॅटफॉर्मवर उभे राहून ५०० फुट खोल दरीचेही दर्शन घडणार आहे. मात्र, या स्कायवॉकचे काम आधी पोलीस दलाच्या वायरलेस यंत्रणेकडून आक्षेप घेत अडविले गेले.

कित्येक दिवस ते बंदच होते. त्या कचाट्यातून ते कसेबसे सुटले. मात्र आता वन विभागाअंतर्गत येणाऱ्या वन व वन्य जीव मंडळाच्या कचाट्यात अडकलेले आहे. वनखाते सध्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडेच आहे. त्यामुळे वडिलांकडे हट्ट धरून आपण हे काम मार्गी लावू शकता. यामुळे चिखलदऱ्यासारख्या आदिवासी बहुल भागात अनेक रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत मिळणार आहे, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे.
बच्चू कडूंच्या आश्वासनानंतर अखेर प्रकल्पग्रस्तांचं उपोषण मागे, आर्थिक मदतीचा दिला शब्द

Source link

Amravati newsChikhaldara hill stationchikhaldara resortchikhaldara weatherNavneet Rananavneet rana partysky walk in chikhaldaraTourism Minister Aditya Thackeray
Comments (0)
Add Comment