coronavirus latest update करोना: आज राज्यात ९,८४४ नवे रुग्ण; ९,३७१ झाले बरे, मृत्यू १९७

मुंबई: राज्यात आज दिवसभरात नव्या रुग्णाच्या संख्येत काहीशी घट झाली असून गेल्या २४ तासात एकूण ९ हजार ८४४ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. आज मात्र नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या किंचित कमी आहे. आज एकूण ९ हजार ३७१ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच, आज दिवसभरात १९७ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. (maharashtra registered 9844 new cases in a day with 9371 patients recovered and 197 deaths today)

आजच्या १९७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५७ लाख ६२ हजार ६६१ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९३ टक्क्यांवर पोहोचले आहे.

सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख २१ हजार ७६७ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा १८ हजार ६८७ इतका आहे. तर, पुण्यात एकूण १७ हजार ३६३ इतके रुग्ण आहेत. ठाणे जिल्ह्यात सध्या १२ हजार ९९९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या ९ हजार ७०४ इतकी आहे. नागपूर जिल्ह्यात ही संख्या ३ हजार ८६२ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या २ हजार ९९९ इतकी आहे.

Source link

corona in maharashtracorona latest newscorona updatescoronavirusCOVID-19 cases
Comments (0)
Add Comment