मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परब, नार्वेकर, वायकर यांच्या बंगल्यांची सीबीआय चौकशी करा: भाजपची मागणी

हायलाइट्स:

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, राज्यमंत्री रविंद्र वायकर आणि मिलिंद नार्वेकर यांनी भव्य बंगले आणि रिसॉर्ट बांधले आहेत- किरिट सोमय्या.
  • या सर्व बंगल्यांची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी भाजप नेते किरिट सोमय्या यांनी केली आहे.
  • अनिल देशमुख यांच्यासारखीच परिवहन मंत्री अनिल परब यांची अवस्था होणार असल्याचेही सोमय्या म्हणाले.

मुंबई: भाजप नेते, माजी खासदार किरिट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर शिवसेना नेत्यांच्या रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड भागातील बंगल्यांचा मुद्दा उपस्थित करत शिवसेना नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, राज्यमंत्री रविंद्र वायकर आणि मिलिंद नार्वेकर यांनी भव्य बंगले आणि रिसॉर्ट बांधले असून याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी भाजप नेते किरिट सोमय्या यांनी केली आहे. अनिल देशमुख यांच्यासारखीच परिवहन मंत्री अनिल परब यांची अवस्था होणार असल्याचेही सोमय्या म्हणाले. (kirit somaiya demands cbi probe into bungalows of chief minister uddhav thackeray anil parab milind narvekar and ravindra waikar)

किरिट सोमय्या मुंबईच आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. अरबी समुद्राच्या पश्चिम किनारपट्टीच्या भागात असलेले दापोली मुरूड येथे अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांचे बंगले आहेत, तर अलिबागकडील मुरूडमध्ये उद्धव ठाकरे व रविंद्र वायकर यांचे बंगले आहेत. एका बाजूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कागदावर १९ बंगलो उभे करतात, दुसऱ्या बाजुला मिलिंद नार्वेकर २५ कोटींचा बंगला बांधतात, तर तिसऱ्या बाजूला परिवहन मंत्री अनिल परब यांनी रिसॉर्ट बांधला आहे. या रिसॉर्टच्या बाजूलाच त्यांचा बंगला देखील आहे. या सगळ्या शिवसेना नेत्यांच्या बंगल्यांची, म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रविंद्र वायकर, अनिल परब आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्यांची सीबीआय चौकशी व्हायला हवी, ही आमची मागणी असल्याचे सोमय्या म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; मुख्यमंत्र्यांचे ऑक्सिजन निर्मिती कंपन्यांना ‘हे’ आवाहन

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नंतर मिलिंद नार्वेकर यांना त्याच वाटेने जावे लागेल असे सोमय्या म्हणाले. मिलिंद नार्वेकर यांनी दापोली-मुरूड समुद्र किनाऱ्यावर भव्य बंगला बांधण्यास सुरूवात केली आहे. हा बंगला अनिल परब यांच्या घरापासून काही फुटांवर आहे. या बंगल्यासाठी समुद्रातील साडेचारशे झाडे कापली आहेत. त्या जागेची किंमत १० कोटी इतकी आहे. तेथे दोन मजली बंगल्याचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे मार्गदर्शन असावे असे दिसते आहे, असे सोमय्या म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- ‘आतासा एक वाझे सापडला, अजून अनेक विभागात अनेक वाझे बाकी’; फडणवीसांचे टीकास्त्र

मिलिंद नार्वेकरांनी या बांधकामासाठी कोणत्याही प्राधिकरणाकडून परवानगी घेतलेली नाही. शेजारीच असल्याने अनिल परब हे मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्यावर जात असतात. तसेच मिलिंद नार्वेकर हे देखील परब यांच्या बंगल्यावर जात असतात. या दोघांच्याही बंगल्यांची काळजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे घेत असतात, असा थेट आरोप सोमय्या यांनी केला आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘अनेकजण अनेक रंग दाखवताहेत, ते रंग बघावे लागतात’; मुख्यमंत्र्यांचा टोला

‘शिवसेना ही बंगलो पार्टी झाली आहे’

या बंगल्यासाठी यांनी ग्रामपंचायतीची खोटी कागदपत्रे तयार केली आहेत आणि याबाबत तहसीलदाराला काहीही माहिती नसल्याचे सोमय्या म्हणाले. एवढे झाल्यानंतरही काही कारवाई करण्यात आलेली नाही. हा बंगला लॉकडाउनच्या काळात बांधलेगेले. लॉकडाउनच्या काळात उद्धव ठाकरेंचा उजवा हात अनिल परब रिसॉर्ट बांधत होते, तर उद्धव ठाकरेंचा डावा हात मिलिंद नार्वेकर भव्य बंगला बांधत होते, असे सांगतानाच शिवसेना ही बंगलो पार्टी झाली आहे, असा टोला किरीट सोमय्यांनी केला आहे.

Source link

Anil ParabCBI probechief minister uddhav thackerayKirit SomaiyaMilind NarvekarRavindra Waikarअनिल परबमिलिंद नार्वेकरमुख्यमंत्री उद्धव ठाकरेरविंद्र वायकर
Comments (0)
Add Comment