Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडीत धुसफूस; कोल्हापूर ‘झेडपी’त राजकारण तापलं

हायलाइट्स:

  • कोल्हापूर जिल्हा परिषदेतील राजकारण तापलं.
  • अध्यक्षपदावर राष्ट्रवादीसह काँग्रेसनेही केला दावा.
  • सत्ताधारी महाविकास आघाडीतील धुसफूस उघड.

कोल्हापूर: गेले चार वर्षे कोल्हापूर जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी सुखात नांदत असताना आता अध्यक्षपदावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षात धुसफूस सुरू झाली आहे. बजरंग पाटील यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या जागेसाठी दोन्ही पक्षाकडून आग्रह सुरू झाला आहे. यामुळे आता जिल्ह्याचे लक्ष ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या निर्णयाकडे लागले आहे. ( Kolhapur Zilla Parishad President Election Update )

वाचा: राज्यात तिसरी लाट कशी रोखणार?; सरकारने केल्या ‘या’ ८ महत्त्वाच्या सूचना

कोल्हापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांनी एकत्र येत भाजपची सत्ता संपुष्टात आणली. त्यामध्ये अध्यक्षपद काँग्रेस, उपाध्यक्षपद राष्ट्रवादी आणि तीन सभापतीपदे शिवसेनेला देण्यात आली. सव्वा वर्षानंतर पदाची अनेकांना संधी देण्यासाठी सर्वच पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत. अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्यासह सर्वांनी राजीनामे दिल्याने सध्या सर्वच पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांसाठी जुलै महिन्यात निवड होण्याची शक्यता आहे. अध्यक्षपदासाठी सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. गेल्यावर्षी ठरल्याप्रमाणे अध्यक्षपद राष्ट्रवादीलाच मिळणार, असा दावा ग्रामपविकास मंत्री मुश्रीफ यांनी केला आहे. दुसरीकडे काँग्रेनेही या पदावर आग्रह धरला आहे. सरीता खोत, राहुल पाटील यांची नावे यासाठी स्पर्धेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने युवराज पाटील, जयवंत शिंपी आणि विजय बोरगे हे अध्यक्ष होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बांधकाम, शिक्षण, अर्थ ही सभापतीपदे शिवसेनेला देण्यात येणार आहेत.

वाचा: करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; पुण्यातील निर्बंधांबाबत झाला मोठा निर्णय

सभापती पदासाठी खासदार संजय मंडलिक यांच्या गटाच्या शिवानी भोसले, माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या गटाच्या कोमल मिसाळ व आमदार प्रकाश आबिटकर गटाच्या वंदना जाधव व अपक्ष सदस्या रसिका पाटील यांची नावे आघाडीवर आहेत.

रुग्णालयातूनच दिला राजीनामा

नवीन सदस्यांना संधी देण्यासाठी पदाधिकारी बदलाच्या हालचाली गेले तीन महिने सुरू आहेत पण सभापती राजीनामे देत नसल्याने अडचणी येत होत्या. हंबीरराव पाटील, प्रवीण यादव आणि पद्माराणी पाटील या सर्व सभापतींची सर्व कामे थांबविल्यानंतर त्यांनी राजीनामे दिले. अध्यक्ष बजरंग पाटील हे करोनाबाधित आहेत. त्यांचा राजीनामा रुग्णालयातच घेण्यात आला.

अध्यक्षपद राष्ट्रवादीलाच मिळणार

कोल्हापूर जिल्हा परिषदेत महाविकास आघाडी सत्तेवर येताना दुसऱ्यादा अध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय झाला होता. या निर्णयानुसार यावेळी हे पद आमच्याच पक्षाला मिळणार आहे, असे हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे.

वाचा: ‘शिवसेनेने काँग्रेसच्या साथीने राज्याला आणीबाणीचे दिवस दाखवले’

Source link

Kolhapur zilla parishad president electionmaha vikas aghadimaha vikas aghadi in kolhapurmaha vikas aghadi in kolhapur zpmaha vikas aghadi latest newsकोल्हापूरमहाविकास आघाडीशिवसेनासतेज पाटीलहसन मुश्रीफ
Comments (0)
Add Comment