अनिल देशमुखांची आजची चौकशी टळली; ‘हे’ आहे कारण

हायलाइट्स:

  • देशमुखांच्या अडचणी वाढण्याची शक्यता
  • दोन स्वीय सहाय्यकांना ईडीकडून अटक
  • ईडीकडून देशमुखांना समन्स जारी

मुंबईः राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरमधील घरी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापेमारी केल्यानंतर आज त्यांना ईडीने समन्स जारी केले होते. मात्र, देशमुख आज चौकशीसाठी हजर राहू शकले नाहीयेत. अनिल देशमुख यांच्यावतीने त्यांच्या वकिलांनी ईडीकडे चौकशीसाठी उपस्थित राहण्याकरता आणखी वेळ मागितला आहे.

शुक्रवारी ईडीने अनिल देशमुख यांच्या मुंबई व नागपूरच्या घरी धाड टाकल्यानंतर देशमुखांची दुपारी कसून चौकशी करण्यात आली होती. तर संध्याकाळी ईडीच्या कार्यालयात त्यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे यांचीही चौकशी करण्यात आली. त्यानंतर मध्यरात्री देशमुखांचे संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर आज सकाळी ११ वाजता अनिल देशमुखांना ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, देशमुखांनी चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी वेळ मागितल्यानं आजची चौकशी टळली आहे.

वाचाः ‘मुख्यमंत्री महाराष्ट्राला बंदीराष्ट्र बनवतायेत; रोजीरोटीचा झगडा पुन्हा सुरू’

आम्ही ईडीला पत्र दिलं आहे आणि कोणत्या प्रकरणाबाबत ही चौकशी सुरु आहे. हे आम्हाला माहिती नाही. त्यासाठी माहिती मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळं आम्ही चौकशीसाठी उपस्थित राहू शकत नाही. आता यावर ईडीने निर्णय घ्यावा, अशी माहिती अनिल देशमुखांचे वकिल अॅड. जयवंत पाटील यांनी दिली आहे.

वाचाःमोठी बातमी: स्वीय सचिवांच्या अटकेनंतर अनिल देशमुखांना ईडीकडून समन्स

नेमकं प्रकरण काय?

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अॅन्टेलिया या घराजवळ एका गाडीत स्फोटके सापडल्यानंतर, मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी एक पत्र लिहून अनिल देशमुख यांनी गृहमंत्री या नात्याने १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीचे लक्ष्य दिल्याचा आरोप केला होता. त्याचवेळी, ईडीने याप्रकरणी माजी पोलीस निरीक्षक सचिन वाझेचीदेखील चौकशी केली. अनिल देशमुख यांनी पैशांचा गैरवापर केला, असा ईडीला संशय आहे. त्यातूनच ईडीने देशमुख यांची याआधी चौकशी केली होती. त्या चौकशीनंतर शुक्रवारी छापे टाकण्यात आले. व आज अनिल देशमुखांना समन्स बजावण्यात आले होते.

वाचाः अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार? दोन स्वीय सहाय्यकांना ईडीकडून अटक

Source link

anil deshmukhanil deshmukh latest newsanil deshmukh news updateed arrests two aides of anil deshmukhed summons anil deshmukhअनिल देशमुखअनिल देशमुख आणि ईडी
Comments (0)
Add Comment