प्रताप सरनाईक शिवसेनेत राहतील का?; पत्रकारांच्या थेट प्रश्नावर संजय राऊत म्हणाले…

हायलाइट्स:

  • खासदार संजय राऊत यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट
  • आघाडीत कुठलाही संभ्रम नसल्याचा निर्वाळा
  • प्रताप सरनाईक यांच्याबद्दलही दिली प्रतिक्रिया

मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मागील तीन दिवसांत त्यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यामुळं चर्चेला उधाण आलं होतं. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून भाजपशी जुळवून घेण्याची विनंती केल्यानंतर त्यांच्याविषयी सध्या संभ्रमाची स्थिती आहे. ते शिवसेनेत राहणार का, अशीही चर्चा आहे. त्या चर्चेवर राऊत यांनी आज खुलासा केला. (Sanjay Raut Meets CM Uddhav Thackeray)

वाचा: ‘या’ मराठी म्हणीची आठवण देत मुख्यमंत्र्यांचं जनतेला आवाहन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी राऊत यांची जवळपास दीड तास चर्चा झाल्यानं उत्सुकता ताणली होती. त्यामुळंच मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मीडियाच्या प्रतिनिधींनी राऊत यांना गराडा घातला व त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्तीच केली. तीन दिवसांत लागोपाठ दुसऱ्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याबद्दल विचारलं असता राऊत म्हणाले, ‘मी ‘सामना’चा संपादक आहे, पक्षाचा नेता आहे आणि खासदार आहे. त्या संदर्भातल्या चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांना भेटलो. अशा भेटीनंतर बाहेर उगाचच संभ्रम पसरवले जातात. ते कोण पसरवतं हे आपल्याला माहीत आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नसताना मी दररोज त्यांना भेटायचो. आता त्यांच्या कामाच्या व्यापामुळं ते शक्य होत नाही. त्यामुळं अशा भेटींचं आश्चर्य वाटून घेण्यासारखं काही नाही.’

‘महाविकास आघाडीत अजिबात संभ्रम नाही. ही आघाडी सुरळीत आणि योग्य दिशेनं पुढं चाललीय. हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल,’ असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.

वाचा: धुसफूस नव्हे, उघड फूट? नगरमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीने काँग्रेसला एकटे पाडले

प्रताप सरनाईक यांची मन:स्थिती शिवसेनेत राहण्याची आहे का, असा थेट प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. त्यावर, ‘प्रताप सरनाईक हे शिवसैनिक आहेत आणि शिवसैनिकच राहतील, असं राऊत म्हणाले. ‘संपूर्ण पक्ष सरनाईक यांच्या पाठीशी आहे. त्यांना चुकीच्या पद्धतीनं त्रास दिला जातोय. त्याबाबत आमची चर्चा झाली आहे. मुख्यमंत्र्यांसह एकनाथ शिंदे, अनिल परब व इतर नेते बसून आम्ही चर्चा करत असतो. आपला आमदार अडचणीत असेल, त्याला विनाकारण त्रास दिला जात असेल तर त्यावर काय मार्ग काढायचा यावर चर्चा होणारच, असं राऊत म्हणाले. ‘मुख्यमंत्र्यांचा आमदारांशी सतत संवाद सुरू आहे. आमच्याशी संवाद सुरू आहे. माझी सरनाईक यांच्याशी चर्चा झाली आहे,’ असंही राऊत यांनी सांगितलं.

वाचा: सुप्रिया सुळे यांच्या समोरच ‘अजित पवार मुर्दाबाद’च्या घोषणा

Source link

Pratap SarnaikSanjay Raut Meets Uddhav Thackerayshiv senaउद्धव ठाकरेप्रताप सरनाईकमहाविकास आघाडीशरद पवारशिवसेनासंजय राऊत
Comments (0)
Add Comment