Palghar Lightning Strikes धक्कादायक: मोबाइल नेटवर्कसाठी विद्यार्थी झाडावर चढले होते; वीज कोसळली आणि…

हायलाइट्स:

  • डहाणूत झाडावर वीज कोसळून भीषण दुर्घटना.
  • झाडावर चढलेल्या मुलांपैकी एकाचा जागीच मृत्यू.
  • मोबाइल नेटवर्कसाठी विद्यार्थी चढले होते झाडावर.

डहाणू: मोबाइल नेटवर्कच्या शोधात झाडावर चढलेल्या मुलांच्या अंगावर वीज पडून घडलेल्या भीषण दुर्घटनेत एकाचा मृत्यू, तर तीन जखमी झाली आहेत. डहाणू तालुक्यातील ओसरविरा गावात आज सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. ( Palghar Lightning Strikes Latest Update )

वाचा: राज्यात पुढचे ३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट

डहाणू तालुक्यात आज दुपारनंतर ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकटाला सुरुवात झाली. यादरम्यान, तालुक्यातील ओसरविरा गावच्या मानकरपाडा येथील काही मुलं मोबाइल रेंज मिळावी म्हणून उंबराच्या झाडावर चढली होती. सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास या झाडावर वीज कोसळली आणि भीषण दुर्घटनेला या मुलांना सामोरं जावं लागलं. वीज अंगावर कोसळून रविन बच्चू कोरडा (वय १६) याचा जागीच मृत्यू झाला तर चेतन मोहन कोरडा (वय ११), दीपेश संदीप कोरडा (वय ११) आणि मेहुल अनिल मानकर (वय १२) हे तिघे जखमी आहेत. यापैकी चेतन आणि दीपेश या दोघांना कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर मेहुल याला अधिक उपचारासाठी धुंदलवाडी येथील वेदांत हॉस्पिटल येथे हलविण्यात आले आहे.

वाचा: इस्रायली कंपनीसोबत महत्त्वाचा करार; मुंबईसाठी हे तर क्रांतिकारी पाऊल!

दरम्यान, ही सर्व शाळकरी मुले असून मृत पावलेला रविन हा इयत्ता नववी शिकत होता. जखमी विद्यार्थी हे सहावी ते आठवी इयत्तेत शिकणारे आहेत. या गावात मोबाइला रेंज येत नसल्याने ही मुले पाड्यापासून दीड किमी अंतरावर झाडावर चढून नेटवर्क मिळविण्याच्या प्रयत्नात होती. तर काही झाडाखाली खेळत असताना ही घटना घडली.

वाचा: फडणवीसांनी किती शपथा मोडल्या?; खडसेंनी दिले ‘हे’ दोन मोठे दाखले

Source link

lightning strikes in dahanulightning strikes in palgharpalghar lightning strikes latest newspalghar lightning strikes latest updatepalghar rains latest newsओसरवीराकासा उपजिल्हा रुग्णालयडहाणूधुंदलवाडीरविन बच्चू कोरडा
Comments (0)
Add Comment