हायलाइट्स:
- डेल्टा प्लस व्हेरिएंटचे महाराष्ट्रात २१ रुग्ण
- राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचा पहिला मृत्यू
- तीन बालकांची डेल्टा प्लस व्हेरियंटवर यशस्वी मात
रत्नागिरीः डेल्टा प्लस व्हेरियंटचे २१ रुग्ण महाराष्ट्रात आढळल्यानं खळबळ माजली होती. मात्र, आता एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. डेल्टा प्लस व्हेरियंटची लागण झालेल्या ३ बालके बरे होऊन घरी परतले आहेत. (Delta Plus Variant In Maharashtra)
रत्नागिरीत डेल्टा प्लस व्हेरियंटची ९ रुग्ण आढळले होते. त्यात या तीन बालकांचादेखील समावेश होता. या बालकांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या बालकांची वये तीन, चार व सहा अशी असून हे तिघंही संगमेश्वर तालुक्यातील आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी डेल्टा प्लसची लागण झालेल्या रुग्णाचा राज्यात पहिला मृत्यू झाला होता. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला होता. डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे मृत्यू झालेली व्यक्ती ८० वर्षांची होती. या व्यक्तीला इतरही काही आजार होते अशी माहिती मिळत आहे.
वाचाः बोगस लसीकरण प्रकरणात बडे मासे?; हायकोर्टाच्या पोलिसांना महत्त्वाच्या सूचना
दरम्यान, राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. सध्या या २१ रुग्णांची माहिती आरोग्य विभागाकडून घेतली जात असतानाच या रुग्णांचे लसीकरण पूर्ण न झाल्याचं समोर आलं आहे. तसंच, यातील ३ रुग्णांचं वय १८ वर्षाखालील असल्यानं ते लसीकरणासाठी पात्र नाहीयेत. डेल्टा प्लसचे रुग्ण आढळलेल्या जिल्ह्यातील लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणात राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
वाचाः करोनाचा धोका आहे, चौकशीला हजर राहू शकत नाही; देशमुखांचं ईडीला उत्तर
काय आहे डेल्टा प्लस व्हेरिएंट?
डेल्टा प्लस व्हेरिएंट हे करोना विषाणूचे बदललेले रूप आहे. हे रुप राज्यात करोनाच्या तिसऱ्या लाटेचे कारण बनण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भारतात करोनाची दुसरी लाट निर्माण होण्याचे डेल्टा प्लस व्हेरिएंट हेच कारण होते. हा डेल्टा सर्वप्रथम भारतात आढळला होता. हा डेल्टा B1.617.2 हे म्यूटेशन आहे.
वाचाः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात; तासाभरानंतर पुन्हा घरी