guideline for ganeshotsav: गणेशोत्सवाबाबत सरकारची नियमावली जाहीर; ‘इतक्या’ फुटांच्या गणेशमूर्तींनाच परवानगी

हायलाइट्स:

  • करोनाचे संकट लक्षात घेत राज्य सरकारने आज गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत.
  • त्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मूर्तीच्या उंचीची मर्यादा ४ फुटांची ठेवण्यात आली असून घरगुती गणपतीची मूर्ती ही २ फुटांची ठेवण्यात आली आहे.
  • नागरिकांची गर्दी होऊ नये या अनुषंगाने गणपतीचे दर्शन ऑनलाईन पद्धतीने ठेवावे, अशीही राज्य सरकारची सूचना आहे.

मुंबई: यंदा गणेशोत्सवासाठी गणपतींच्या मूर्तीच्या उंचीवर बंधने नकोत, अशी विनंती गणेशोत्सव मंडळांनी केलेली असताना करोनाचे संकट लक्षात घेत राज्य सरकारने आज गणेशोत्सवासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मूर्तीच्या उंचीची मर्यादा ४ फुटांची ठेवण्यात आली असून घरगुती गणपतीची मूर्ती ही २ फुटांची असावी अशी मर्यादा राज्यसरकारने घालून दिली आहे (ganeshotsav 2021 state govt declares new guidelines for ganeshotsav and set a limit on the height of ganesh idols)

गणेश मूर्तीकार आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा गणपतींच्या मूर्तींवर उंचीची मर्यादा नको, आम्ही करोनाकाळातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करू, अशी भूमिका घेतली होती. याबरोबरच तातडीने गणेशोत्सवाबाबतचे सरकारचे धोरण जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली होती. गणेशोत्सवाला अवघ्या दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. राज्य सरकारने कोणतेही धोरण जाहीर न केल्याने गणेशमूर्ती तयार करण्याचे कामही अद्याप सुरू करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे मूर्तीकार आणि मंडळांनी सरकारला तातडीने धोरण जाहीर करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आता राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे.

क्लिक करा आणि वाचा- पोहण्याचा मोह महागात ; जळगाव जिल्ह्यात काका-पुतण्याचा बुडून मृत्यू

गृहविभागाच्या गणेशोत्स साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना:

> सार्वजनिक गणेशमूर्ती ४ फूटांची आणि घरगुती गणेश मूर्तीची उंची २ फूटांची असावी.
> गणेशोत्सवाबाबत परवानगी घेणे अपेक्षित.
> नागरिक देतील ती वर्गणी स्विकारावी.
> कोरोना संसर्ग पाहून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा.
> विसर्जन कृत्रिम तलावात करावे, शक्यतो शाडूच्या मातीची मूर्ती ठेवावी.
> मंडप परिसरात होणारी गर्दी टाळावी.
> सांस्कृतिक उपक्रमाऐवजी आरोग्य कार्यक्रम राबवावेत.
> आरती, भजन, किर्तन या दरम्यान होणारी गर्दी टाळावी.
> गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी.
> नागरिकांची गर्दी होऊ नये या अनुषंगाने गणपतीचे दर्शन ऑनलाईन पद्धतीने ठेवावे.

क्लिक करा आणि वाचा- बीएचआर गैरव्यवहार: मुख्य सुत्रधार अवसायक जितेंद्र कंडारे यांस अटक

दरम्यान, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि मूर्तीकारांनी मूर्तींच्या उंचीची मर्यादा ठेवू नये अशी विनंती राज्य सरकारला केली होती. त्यानंतर आता मूर्तींच्या उंचीवरील मर्यादा घातली गेल्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि मूर्तीकारांनची प्रतिक्रिया जाणून घेणे महत्वाचे ठरणार आहे.

क्लिक करा आणि वाचा- अनिल देशमुखांना अटक होईल, मी ईडीला सर्व पुरावे दिले आहेत: अॅड जयश्री पाटील यांचा दावा

Source link

Ganeshotsav 2021guideline for ganeshotsavगणेशोत्सवगणेशोत्सवाबाबत सरकारची नियमावलीसार्वजनिक गणेशोत्सव
Comments (0)
Add Comment