एरंडोल येथे सोमवारी आढळले २०कोरोना रूग्ण..!


एरंडोल: येथे १७जानेवारी सोमवार रोजी कोरोना चे २० नवे रुग्ण आढळुन आले तर कासोदा येथे एकाच कुटुंबातील पती, पत्नी व २मूले असे ४रूग्ण आढळुन आले.

एरंडोल तालुक्यात एकाच दिवशी २४रूग्ण आढळुन आल्यामुळे रूग्णसंख्येचा आलेख उंचावत असल्याचे दिसून येते.
या नव्या रूग्णांना घरीच विलगीकरणात राहण्याचा सल्ला आरोग्य यंञणेकडुन देण्यात आला आहे.

दरम्यान्
तालुक्यात अनेक दिवसांपासुन वातावरणात बदल झाला असुन यामुळे सर्दी-पडसे, खोकला,ताप या आजारांची रूग्णसंख्या वाढली आहे.

दिवसभर थंडी जाणवत आहे त्यामुळे ठिकठिकाणी राञी व भल्या पहाटे शेकोट्या आढळुन येतात.

Comments (0)
Add Comment