एरंडोल तालुक्यात कोरोना रूग्णसंख्येत वाढ सुरूच..!


एरंडोल: १७जाने.२०२२ मंगळवार रोजी तालुक्यात १३ नविन कोरोना चे रूग्ण आढळुन आले आहेत.
त्यात १०रूग्ण एरंडोल येथील व ३रूग्ण ग्रामीण भागातील आहेत.

मकरसंक्रांतीपासुन शहरी व ग्रामीण भागात कोरोना रूग्णसंख्येत वाढ होत आहे.
वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता जणू यंदाची संक्रांत कोरोना घेऊन आलेली आहे की काय..?
अशी चर्चा जनमानसात होत आहे.

एरंडोल शहरात १० नवे रुग्ण आढळुन आले असुन एकाच कुटुंबात २ते३ रूग्णांचा समावेश आहे.
२रूग्ण कासोदा येथील व १रूग्ण पिंपळकोठा येथील आहे.
रूग्णसंख्या वेगाने वाढत असली तरी सर्व रूग्ण विलगीकरणात राहुन कोरोनावर मात करीत असल्याचे दिसुन येते त्यामुळे कोरोना हा सर्दी पडसे खोकल्यासारखा आजार आहे असे वैद्यकीय क्षेञातील जाणकारांचे मत आहे.

कोरोनाबाबत जीवाला धोका नसला तरी नागरीकांनी निष्काळजीपणाने न राहता कोरोना नियमावलींचे पालन करणे गरजेचे आहे.

तथापी..
प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसिलदार सुचेता चव्हाण, मुख्याधिकारी विकास नवाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज शेख, ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक हे आपल्या सहकारी ‘कमांडोज, सह कोरोनाविरूध्द लढा देण्यासाठी तैनात आहेत.

Comments (0)
Add Comment