Nawab Malik विधानसभाध्यक्षपद: महाविकास आघाडीच्या संख्याबळावर राष्ट्रवादीचा मोठा दावा

हायलाइट्स:

  • विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू.
  • पावसाळी अधिवेशनात निवडणूक प्रक्रिया होण्याची शक्यता.
  • बहुमतावेळी जी संख्या होती त्यापेक्षा जास्त मतांनी जिंकू: मलिक

मुंबई: ‘आमदारांचे करोना रिपोर्ट आल्यावर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अंतिम निर्णय होईल परंतु, आम्ही विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बहुमत सिद्ध करताना जी संख्या होती त्यापेक्षा जास्त मतांनी जिंकू’, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज व्यक्त केला. ( Maharashtra Assembly Speaker Election Update )

वाचा: ‘वडेट्टीवार, भुजबळ खोटारडे; कोर्टाने ती माहिती मागितलीच नव्हती’

विधानसभा उपाध्यक्षांना पत्र लिहून सरकारने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याबाबत सूचवलं आहे. निश्चितपणे महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेणे आवश्यक आहे. त्याबाबत तिन्ही पक्षांत एकमत आहे. दोन दिवसाचं अधिवेशन असलं तरी याच अधिवेशनात अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम करता येईल यावर विचारविनिमय सुरू आहे, असेही नवाब मलिक यांनी पुढे नमूद केले.

राज्यपाल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लवकर करा, असे सूचित करत आहेत त्याचे स्वागत असून विधानपरिषदेच्या १२ जागा रिक्त आहेत तो विषयही प्रलंबित न ठेवता निकाली काढावा. म्हणजे हे १२ सदस्य महाराष्ट्रातील जनतेच्या विकासासाठी काम करून शकतील, असेही मलिक म्हणाले. याबाबत राज्यपालांकडे आम्ही वारंवार आग्रह धरला आहे आणि आज पुन्हा एकदा ती विनंती करत आहोत, असेही मलिक म्हणाले. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आम्ही घेऊच पण त्याअगोदर १२ आमदार नियुक्तीचे प्रकरण निकाली काढा, आग्रहही मलिक यांनी राज्यपालांना केला.

वाचा:अजित पवारांच्या अडचणी वाढवणार?, CBI चौकशीसाठी थेट अमित शहांना पाठवलं पत्र

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची गेल्या आठवड्यात भेट घेऊन त्यांच्याकडे याबाबत मागणी केली होती. विधानसभा अध्यक्षांचे संविधानिक पद तातडीने भरण्यात यावे तसेच विधिमंडळ अधिवेशनाचा कालावधी वाढवावा आणि राज्यातील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सद्यस्थितीत घेण्यात येऊ नयेत, अशी विनंती त्यांनी निवेदनात केली होती. या तिन्ही मागण्यांवर कार्यवाही करण्यात यावी व मला त्याबाबत अवगत करावे, अशी सूचना करणारे पत्र राज्यपालांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. फडणवीस २३ जून रोजी राज्यपालांना भेटले होते आणि २४ जून रोजी राज्यपालांनी हे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. हे पत्र आज माध्यमांच्या हाती आलं आहे. यावरच मलिक यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

वाचा: फडणवीसांच्या तीन मागण्यांवर कार्यवाही करा; राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्यासाठी आणि महाविकास आघाडीसाठी शरद पवार प्रयत्न करत असतात

Source link

assembly speaker electionmaharashtra assembly speaker electionmaharashtra assembly speaker election updatenawab malik on assembly speaker electionncp on maharashtra assembly speaker electionउद्धव ठाकरेनवाब मलिकभगतसिंह कोश्यारीराष्ट्रवादीविधानसभा अध्यक्ष
Comments (0)
Add Comment