गुहागर, दि.०९ :- बौद्धजन सहकारी संघ शाखा क्र. २४ व रमाई मंडळ याच्या संयुक्त विद्यमाने त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचा जयंती महोत्सव जेतवन बुद्ध विहार, मुंढर येथे आयु. संदीप गमरे यांच्या अध्यक्षतेखाली मोठया थाटात संपन्न झाला.
अखिल बहुजन समाजाची माता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माता रमाई यांचा त्याग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जडणघडणीत अत्यंत मोलाचा ठरतो व त्याच त्यागामुळे दलित, शोषित समाजाला कलाटणी मिळाली.
सदर कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती सुनील पवार, सरपंच सुशील आग्रे, माजी पंचायत समिती माजी सदस्य प्रभाकर शिर्के, माजी सरपंच प्रमोद शिर्के, ग्रामसेवक सुरेश गमरे, उपसरपंच सौ. शीतल गमरे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, उपस्थित मान्यवरांनी तसेच बालविद्यार्थी आर्यन गमरे, निधी जाधव, निलेश गमरे, प्रा. उमेश जाधव यांनी माता रामाईंच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून पाणी साठवण टाकीचे उदघाटन सभापती सुनील पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले त्यानंतर शाखेच्या व महिला मंडळाच्या वतीने पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करून बुद्धपूजा पाठ करण्यात आला.
सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्याची जबाबदारी महिला मंडळ अध्यक्षा सौ. स्मिता मोहिते, विनया मोहिते, प्रेरणा गमरे, प्रतीक्षा पवार, माधवी सकपाळ, शैला पवार यांनी योग्यरीत्या पेलावली त्यामुळे त्यांचा ही यथोचित सत्कार करण्यात आला व त्यांनतर सर्व उपस्थितांनी सहभोजनाचा आस्वाद घेतला
सायंकाळच्या सत्रात महिला मेळावा घेण्यात आला, रात्रीच्या सत्रात सहभोजनाचा आस्वाद घेऊन शाखेचे महासचिव प्रदीप गमरे यांनी बौद्धजन सहकारी संघ शाखा क्र. २४, माता रमाई महिला मंडळ, विद्यार्थी विद्या विकास मंडळ, कन्या मंडळ या सर्व मंडळाच्या पदाधिकारी व सदस्य यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
आलीबाग प्रतिनिधी :- प्रवीण रा. रसाळ