प्रत्येक माता-भगिनी व पुरुष यांना संजय गांधी निर

नीरा नरसिंहपूर, दि.०९, :- पंटणु  व नरसिंहपूर तालुका इंदापूर येथे संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष सागरबाबा मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी सरपंच नरहारी काळे, सरपंच प्रतिनिधी पंचवीसचंद्रकांत सरवदे,  नरसिंहपूरच्या विद्यमान सरपंच अश्विनी सरवदे, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष सागरबाबा मिसाळ बोलत आसताना म्हणाले की संजय गांधी निराधार योजना तालुक्यातील प्रत्येक घराघरात गोरगरीब यांच्या कुटुंबात या योजनेचा लाभ मिळवून दिला जाईल. विधवा महिला, अपंग, निराधार दिव्यांग, परीतत्य,  आंध, निराधार आहेत, आशा सर्व लोकांसाठी व महिलांसाठी संजय गांधी निराधार योजना आहे. राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांनी मला मनाचा मोठेपणा दाखवून  संजय गांधी निराधार योजनेचा तालुका अध्यक्षपद मिळवून दिले. म्हणूनच मी मामांचे मनापासून आभार मानतो.या पदाचा चांगल्या प्रकारे तालुक्यात उपयोग करून गोर गरीब व कष्टकरी शेतकऱ्यापर्यंत व तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवर सर्वांना याचा लाभ मिळवून देणार, ही योजना काय आहे ते समजून घ्या आणि या योजनेसाठी लागणारे सर्व कागदपत्रे ग्रामपंचायत ऑफिस मध्ये जमा करून प्रत्येक महिन्याला सर्व प्रकरण मंजूर करून देण्याची जबाबदारी माझी आहे. प्रत्येक महिन्याच्या मिटींगला आलेली सर्व प्रकरणे मंजूर करून त्यांना लाभ मिळवून देणार असल्याचे यावेळी तालुका अध्यक्ष सागरबाबा मिसाळ यांचे उद्गार. या कार्यक्रमा साठी उपस्थित तालुका अध्यक्ष सागरबाबा मिसाळ, विजय कुमार राखुंडे, आमोल लोंढे, आशोक घोडके, माजी सरपंच नरहर काळे, सरपंच प्रतिनिधी चंद्रकांत सरवदे, विद्यमान सरपंच अश्विनी सरवदे, ग्रामपंचायत सदस्य नितीन सरवदे, दशरथ राऊत सचिन जगताप अभयकुमार वाकर, प्रभाकर जगताप, एकनाथ सरवदे, युवराज गायकवाड, आदर्श ग्रामसेवक गणेश लंबाते, तलाठी बिराजदार, डॉक्टर सिद्धार्थ सरवदे व गावातील सर्व ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नरसिंहपूर, प्रतिनिधी :-डॉ. सिद्धार्थ सरवदे



Comments (0)
Add Comment