नीरा नरसिंहपूर, दि.०८ :- गोंदी तालुका इंदापुर येथील मंजूर झालेली 26 लाखाची विकास कामे काँक्रिटीकरण रस्ते चार असून 1 जानेवारी या दिवशी 4 कॉंक्रिटीकरण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन सरपंच रंजीत वाघमोडे व उपसरपंच अंगद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व विद्यमान सरपंच इंदुमती रामहरी वाघमोडे यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन संपन्न झाले होते. कॉंक्रिटीकरण रस्त्याचे काम उद्घाटन केल्यापासून 30 दिवसात चारही रस्त्याची कामे पूर्ण झाल्यामुळे गोंदी परिसरातील ग्रामस्थ सरपंच रंजीत वाघमोडे व उपसरपंच अंगद देशमुख यांचे अभिनंदन करून आनंद व्यक्त करीत आहेत. गोंदी गावचा विकास चांगल्या प्रगतीच्या दिशेने निघाल्यामुळे सर्वत्र ठिकाणी चर्चा सुर निघत आहे. पूर्ण झालेली रस्त्याची कामे (1) मशानभुमी ते जुनी जिल्हा परिषद शाळा 5 लाख(2) अहिल्याबाई चौक ते जाधव वस्ती 8 लाख(3) वाघमोडे दुकान ते दत्ता डांगे घर 5
लाख(4) दत्ता डांगे घर ते डांगे वस्ती 8 लाख एक महिन्याच्या आत एकूण 26 लाख रुपये विकास कामे झाल्याने गोंदी ग्रामपंचायतीचे सर्वच भागांमध्ये कौतुक होत आहे.
नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी : -डॉक्टर सिद्धार्थ सरवदे,