चुलतभावा सोबतच्या संबंधातून जन्मलेलं 5 दिवसांचं बाळ ताम्हिणी घाटात फेकलं, पौड पोलिसांनी 4 आरोपीस ठोकल्या बेड्या

पुणे ग्रामीण,दि.१३ :-चुलतभावा सोबतच्या संबंधातून जन्मलेलं ४ ते ५ दिवसांचं बाळ पुण्यातील ताम्हिणी घाटात फेकल्याचा प्रकार समोर आला आहे.चुलत भावाशी आलेल्या शरीर संबंधातून जन्माला आलेले बाळ नातेवाईकांच्या दबावामुळे घाटात फेकून दिल्याची घटना घडली. ज्याच्यापासून बाळ झाले त्यानेच हे ४ ते ५ दिवसांचे बाळ फेकून दिलेय. आता पोलीस आणि ट्रेकर्सच्या मदतीने त्या बालकाच्या मृतदेहाचा शोध सुरु आहे.याबाबत माहिती अशी की, बाळाची आई मंगल पवार ही पुण्यातील घोटवडे भागात गोडांबेवाडी गावात मजुरी करते. तिच्या पतीचे निधन झाले असुन पहिल्या पतीपासून तिला 1 मुलगी आहे. मात्र गोडांबेवाडीत मंगलच्या सोबतच मजुरी करणाऱ्या सचिन चव्हाण या चुलत भावाशी तिचे शारीरिक संबंध आले. त्या संबंधातून तीला मुलगा झाला. परंतु, ही गोष्ट तिच्या कुटुंबाला सहन झाली नाही.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील असणारे चव्हाण कुटुंब 5 तारखेला रत्नागिरी जिल्ह्यातील गावाला जायचे आहे असं सांगून मंगल पवारला कारमधे घेऊन तिचे चुलत भाऊ संजय चव्हाण, नितिन चव्हाण , अजय चव्हाण आणि सचिन चव्हाण हे निघाले होते. पण, ताम्हीणी घाटातील दरी पुलाजवळ गाडी आली असता ज्याच्यापासून बाळ झाले होते त्या जीवे मारण्याची धमकी देवुन सचिन चव्हाणने मंगल पवारच्या हातातून बाळ खेचून घेतले आणि ते दरीत फेकुन दिले.या दरम्यान मंगल पवार

आणि त्यांच्या मुलीला कारमध्ये लॉक करुन ठेवले होते.मंगल पवारने घोटवड्याला परत आल्यानंतर या घटनेबाबत पोलिसांत तक्रार केली. फिर्यादी सौ . मंगल विजय पवार , वय २७ वर्षे , सध्या रा शेळकेवाडी गोडांबेवाडी ता मुळशी जि पुणे मुळ आंबेत , ता . म्हसळा , जि . रायगड हिची आरोपी नामे १ ) संजय गंगाराम चव्हाण , वय ३४ वर्षे , २ ) नितीन गंगाराम चव्हाण , वय २७ वर्षे , ३ ) अजित उर्फ अजय गंगाराम चव्हाण , वय २२ वर्षे , ४ ) सचिन गंगाराम चव्हाण , वय २४ वर्षे , सर्व रा . आंबडस ता . खेड , जि . रत्नागिरी याचे विरुध्द गुन्हा दाखल करणेत आला आहे . सदर दाखल गुन्हयाची उकल करून आरोपींचा शोध घेवुन गुन्हयात अटक करणेबाबत पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी सुचना दिल्याप्रमाणे लागलीच पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव , पो.हवा . सपकाळ , पो.हवा . सुधिर होळकर , हवेली पोलीस स्टेशनच्या म.पो.कॉ. स्वप्नाली कोलते , असे पोलीस पथक रवाना केले असता त्यांनी आरोपी याचा आंबडस ता . खेड , जि . रत्नागिरी राहते परीसरात शोध घेवुन वरील ४ आरोपींना ताब्यात घेवुन ठाणेत हजर केले असता त्यांचेकडे अधिक तपास करता त्यांनी नवजात बालक याचे अपहरण करून त्याचा गळा दाबुन ताम्हिीणी घाटात फेकुन दिल्याचे सांगितले आहेत . सदरची कामगिरी ही डॉ. अभिनव देशमुख , पोलीस अधीक्षक , पुणे ग्रामीण , मितेश घट्टे , अपर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण , यांचे मार्गदर्शनाखाली . अशोक धुमाळ , पोलीस निरीक्षक , पौड पोलीस स्टेशन सहा पोलीस निरीक्षक पवन चौधरी , पो . उप निरीक्षक श्रीकांत जाधव , सचिन शिंदे सहा फौजदार , पो.हवा . सपकाळ , पो.हवा.सुधिर होळकर , म.पो.कॉ. स्वप्नाली कोलते , पो . चालक शेखर हगवणे सह शिवदुर्ग रेस्कु टिम लोणावळा व मुळशी आपत्ती व्यवस्थापन टिम , इतर पोलीस स्टाप असे नवजात बालक याचा ताम्हिणी घाट परीसरात शोध कार्य चालु आहे . डॉ . अभिनव देशमुख , पोलीस अधीक्षक , पुणे ग्रामीण. मितेश घट्टे , अपर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण , उपविभागीय पोलीस अधिकारी , हवेली विभाग , पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली दाखल गुन्हयाचा पुढील तपास पवन चौधरी , स.पो.नि. पौड पोलीस स्टेशन हे करीत असुन अटक आरोपी यांना दि . १२/०२/२०२२ रोजी मा . न्यायालयात हजर ठेवले असता त्यांची मे . कोर्टाने ७ दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिले आहे .

Comments (0)
Add Comment