पुणे,दि.१३ :- शिवाजीनगर आणि पुणे कंन्टोमेंट मतदारसंघ कांग्रेसचा बाले किल्ला होता पण काही स्वार्थी नेत्यांमुळे हातातून गेला. कॉंग्रेस पक्षाने ज्यांना महापौर केलं, उपमहापौर केलं ,आमदार केलं अशानीं गद्दारी करित पक्ष सोडला. आणि तेच आता पुन्हा कांग्रेस मध्ये दिसत आहे.शिवाजीनगर आणि पुणे कंन्टोमेंट मतदारसंघात काँग्रेसचा बालेकिल्ला प्रस्थापित करण्याची हीच वेळ आहे.आगामी निवडणूकीत नवीन युवा सूशिक्षत चेहर्यांना संधी दिली पाहिजे असे मत पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी व्यक्त केले.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनोद रणपिसे यांनी बोपोडी येथील अग्रवाल धर्मशाळा येथे कार्यकर्ता संवाद मेळावा आणि पक्ष प्रवेश कार्यक्रम आयोजित केला होता.याप्रसंगी रमेश दादा बागवे बोलत होते. कार्यक्रमांस माजी आमदार दिप्ती चौधरी, माजी नगरसेवक दत्ता बहिरट, नंदलाल धिवार, शैलेजा खेडेकर, पुणे शहर महिला अध्यक्ष पूजा मनिष आनंद, बोपोडी ब्लॉक अध्यक्ष राजेंद्र भुतडा, अंजनेय साठे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोपोडी प्रभागातील बोपोडी गावठाण, औंधरोड, चिखलवाडी, गोखलेनगर अशा विविध भागातून 10 महिला व 10 पुरुषांनी असे सुमारे 100 ते 150 कार्यकर्त्यांनी विनोदजी रणपिसे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी दत्ता बहिरट म्हणाले की, कॉग्रेसचे तिन्ही उमेदवार निवडून येथील असा बोपोडी मतदार संघ आहे. विनोद रणपिसे यांनी संवाद मेळावा आयोेजित केला, असेच संवाद, मंथन मेळावे पुणे शहरात ठिकठिकाणी पक्ष मजबूत करण्यासाठी आयोजित केले पाहिजे.
तसेच विनोद रणपिसे म्हणाले की, काँग्रेस शिवाय पुणे शहरासोबतच देशाला पर्याय नाही त्यामुळे महापालिकेवर काँग्रेसचे वर्चस्व वाढले तर महाराष्ट्रातही सत्ता येईल आणि पुढे केंद्रातही येईल. त्यासाठी कॉंग्रेस मध्ये युवा पिढी प्रवेश करित आहे, त्यांना संधी दिली पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्रजी भुतडा यांनी केले असून सौ.पूजा आनंद यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले.