मनसेच्या मा.नगरसेविका जयश्री गजानन मारणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

पुणे,दि.१६ :- पुणे महापालिका निवडणूक २०२२ काही महिन्यांवर आली असताना पक्षांतर करण्याचे वारे वाहू लागले आहे. सत्तेची आगामी गणिते लक्षात घेऊन इच्छूक उमेदवारांनी पक्षांतर सुरु केले आहे.सर्वाधिक इच्छुक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सुरू असून आज मनसेच्या माजी नगरसेविका जयश्री गजानन मारणे (यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.शरद पवार, अजित पवार व सुप्रिया सुळे यांच्या विचारांवर निष्ठा दाखवून जायश्री मारणे
या राष्ट्रवादी काँग्रेस परिवारात दाखल झाल्या आहेत. येत्या काळात शहरातील अनेक मातब्बर आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये दिसतील,असे सूचक विधान शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले.

 

Comments (0)
Add Comment