एरंडोल – (जिल्हा जळगाव) संपादक – शैलेश चौधरी
एरंडोल: रिंगणगाव-विखरण रस्त्यावर भर दुपारी सराफ व्यावसायीक राजेंद्र बबन विसपुते यांच्या लुटमार प्रकरणी अवघ्या काही तासांतच गुुन्हे अन्वेषण शाखेने ४ आरोपींच्या मुसक्या आवळल्या तर १ आरोपी फरार आहे. गुरूवारी राञी उशिरा जळगाव गुन्हे अन्वेषण शाखेकडुन अटक करण्यात अालेले चारही आरोपींना एरंडोल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.आरोपींची नावे पुढीलप्रमाणे- डिगंबर उर्फ डिग्या रविंद्र सोनवणे वय-२९ रा.भोकर ता. जि. जळगाव ,विशाल अरूण सपकाळे वय-२१ रा. कोळीपेठ, विठ्ठलमंदीराजवळ जळगाव, विशाल लालचंद हरदे वय-२६ वर्षे रा.चौगुले प्लॉट,जळगाव,संदीप राजू कोळी वय-२१वर्षे रा. कुरंगी ता. पाचोरा हल्ली मु. कुसुंबा(जळगाव) ,आकाश उर्फ धडकन सुरेश सपकाळे या. कोळीपेठ,जळगाव (फरार)एरंडोल पोलिस स्टेशन सूञांकडून मिळालेल्या माहीतीनुसार आरोपी संदीप कोळी व आकाश सपकाळे हे दोघे सराफ राजेंद्र विसपुते यांच्यावर पाळत ठेवून होते तसेच संदीप कोळी कडुन मॉडीफाय केलेली सुझुकी मोटरसायकल एम. एच.१९ डि. ४००० ही पोलिसांनी ताब्यात घेतली व सराफ विसपुते यांची दुचाकी एम. एच.१९ ९७८१ ही डिगंबर सोनवणे याच्याकडुन आसोदा रेल्वेगेटजवळ मिळुन आली. डिगंबर सोनवणे हा सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे तसेच चोरीस गेलेला ऐवज व गुन्ह्यात वापरलेले गावठी पिस्तुल आकाश उर्फ धडकन याच्या ताब्यात दिले असल्याने तो अद्यापपावेतो फरार असुन संदीप कोळी याच्या ताब्यातुन सुझुकी दुचाकी हस्तगत करण्यात आली.संदीप कोळी हा रवंजे बु! ता.एरंडोल येथे काही काळ वास्तव्यास असल्याचे तपासात निष्पन्न झाले.दरम्यान.. पोलिस यंञणा या गुन्ह्यातील फरार असलेल्या ‘धडकन, चा शोध घेत आहेत. एरंडोल पोलिसांच्या ताब्यात असलेले ४ आरोपी पोपटासारखे बोलतीलच अशी अपेक्षा आहे.