दुचाकी व अ‍ॅल्युमिनीयमच्या पट्ट्या चोरणाऱ्या सराईत गुन्हेगार खडक पोलिसांच्या जाळ्यात ; 2 लाखाचा मुद्देमाल जप्त

पुणे,दि.१८ :- पुणे परिसरातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या व दुकानाच्या बाहेर ठेवलेल्या अ‍ॅल्युमिनीयमच्या पट्ट्या चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे.खडक पोलिसांनी आरोपीला स्वारगेट येथील वेगा सेंटर समोरील बोळात सापळा रचून अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून दुचाकी आणि अ‍ॅल्युमिनीयमच्या पट्ट्या असा एकूण 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करुन 5 गुन्हे उघडकीस आणले आहेत.
जैद ऊर्फ लंगडा जमीर दलाल (वय -20 रा. 329, घोरपडे पेठ, अल्हद सोसायटी चौथा मजला मोमीनपुरा कब्रस्तानच्या समोर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पुण्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे गुन्हे वाढत असल्याने खडक पोलीस ठाण्यातील तपास पथकाला रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी दिले होते. त्यानुसार खडक पोलीस स्टेशन हद्दीतील रेकार्डवरील गुन्हेगार चेक करीत असतांना पोलीस अंमलदार रवी लोखंडे व सागर घाडगे यांना गोपनीय माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार जैद ऊर्फ लंगडा जमीर दलाल याने मक्का टॉवर सोसायटी मधील एक्सलंट एन्टरप्रायझेस या दुकानाचे बाहेर ठेवलेल्या अ‍ॅल्युमिनीयमच्या पट्ट्या व पुणे शहरातुन वेगवेगळ्या ठिकाणावरून अ‍ॅक्टीव्हा गाड्यांची चोरी केली असुन तो स्वारगेट वेगा सेंटर समोरील बोळात थांबलेला आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीला पकडुन त्याचाकडुन स्वारगेट येथील धोबी घाट कॅनाल लगत लपवुन ठेवलेल्या लहान मोठ्या 22 अ‍ॅल्युमिनियमच्या पट्ट्या व 5 अ‍ॅक्टीव्हा मोपेड गाड्या जप्त केल्या. त्यातील एका गाडीचा वापर त्याने अ‍ॅल्युमिनियमच्या पट्ट्या चोरी करताना वापर केला होता. जप्त केलेल्या अ‍ॅक्टीव्हा खडक 2, हडपसर 1 आणि कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 1 चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपीकडून एकुण 2 लाख 20 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी जैद ऊर्फ लंगडा जमीर दलाल हा सराईत गुन्हेगार असुन त्याचावर यापूर्वी खडक, भारती विद्यापीठ, मार्केटयार्ड पोलीस ठाणे खुनाचा प्रयत्न, खंडणी मागणे, दरोडाची पुर्व तयारी, जबरी चोरी इत्यादी प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.कारवाई ही पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे राजेंद्र डहाळे,पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ डॉ . प्रियंका नारनवरे व. सतिश गोवेकर , सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग यांचे मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशन चे श्रीहरी बहिरट , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , हर्षवर्धन गाडे पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) , राहुल खंडाळे , पोलीस उप निरीक्षक व पोलीस अंमलदार अजीज बेग , संदिप पाटील , रवी लोखंडे , सागर घाडगे , राहुल मोरे , विशाल जाधव , हिंमत होळकर , कल्याण बोराडे , नितीन जाधव , प्रवीण गव्हाणे , समीर शेख , किरण शितोळे , महेश पवार यांचे पथकाने केली आहे .

Comments (0)
Add Comment