एरंडोल: तालुक्यातील चोरटक्की गावानजिक सोन्या-चांदीचे व्यापारी राजेंद्र विसपुते यांच्या लुटप्रकरणी अटकेत असलेल्या ४ आरोपींना शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एरंडोल न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्या.व्ही.एस. धोंडगे यांनी आरोपींना २१फेब्रुवारी २०२२ सोमवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
डिगंबर उर्फ डिग्या रविंद्र सोनवणे वय-२९ रा.भोकर ता. जि. जळगाव ,विशाल अरूण सपकाळे वय-२१ रा. कोळीपेठ, विठ्ठलमंदीराजवळ जळगाव, विशाल लालचंद हरदे वय-२६ वर्षे रा.चौगुले प्लॉट,जळगाव,संदीप राजू कोळी वय-२१वर्षे रा. कुरंगी ता. पाचोरा हल्ली मु. कुसुंबा(जळगाव) या आरोपींना गुरूवारी राञी जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेकडुन एरंडोल पोलिसांनी ताब्यात घेतले.
सरकारी वकील आर.पी.सुरळकर व आरोपींचे वकील अँड. शेखर खैरनार या दोघांचा युक्तिवाद ऐकून न्यायमूर्ती धोंडगे यांनी आरोपींना पोलिस कोठडी दिली.