एरंडोल: घरबांधणीसाठी माहेरून २०लाख रूपये आणावेत म्हणून येथील माहेरवाशिणीचा सासरच्या मंडळींकडुन वेळोवेळी शारीरीक व मानसिक छळ करण्यात आला.
याप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशन ला रवीवारी राञी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
विशेष हे की.. फिर्यादी महीला ही शासकीय तंञनिकेतन, मालेगाव येथे अधीव्याख्यात्यापदी कार्यरत आहेत तर त्यांचे पती हितेश जगन्नाथ निकम हे नाशिक येथे नोकरीस आहेत.
हितेश जगन्नाथ निकम(पती),जगन्नाथ नारायण निकम(सासरे),अनुराधा जगन्नाथ निकम(सासू),समीर निकम(दिर),सर्व रा.प्लॉट नं.१२ देवदत्त अपार्टमेंट,आनंदनगर ,गंगापूर रोड,नाशिक येथील आहेत तसेच राजेंद्र निकम(चुलतसासरे),वर्षा निकम (चुलतसासू) यांचादेखील आरोपींमध्ये समावेश आहे.
पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुनिल लोहार, अनिल पाटील, अकील मुजावर,मिलींद कुमावत हे पुढील तपास करीत आहेत.