पुणे,२१:-पुणे शहर पोलीस आयुक्तालय आज आधुनिक पद्धतीने पत्रकार कक्षाचे उद्घाटन महाराष्ट्रचे ज्येष्ठ पत्रकार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते उद्घाटन झाले व पोलीस अधिकारी यांचा उद्घाटनाच्या वेळेस वरिष्ठ पोलिस अधिकारी यांचे सत्कार करण्यात आला त्यावेळी काही ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते. यादरम्यान सत्कार समारंभ काही पत्रकारांनी आपसात संगणमत करून अधिकार्यांचे मन जिंकण्याचा खोटा प्रयत्न केला आहे. पुणे शहर क्राईम रिपोर्टर नसुन सुद्धा त्यांचा सत्कार करण्यात आला त्यांच्या काही दैनिक व साप्ताहिक किंवा त्यामध्ये कोणताही संबंध नसताना सुद्धा यांचाही सत्कार करण्यात आला हे खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. या सत्कार समारंभा मध्ये पुणे शहर पोलिसांचा निवडणूक प्रक्रियेमध्ये पुणे शहर पोलिसांचा काही संबंध नाही, काही ठराविक पत्रकार स्वतःची गटबाजी करून ज्येष्ठ पत्रकारांचे विचार न करता आपआपसात संगनमत करून परस्पर नियोजन करून सत्कार करण्यात आले. पुणे शहर पोलीस कक्षात पहिल्यांदा अशी घटना इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे .पुणे शहर पोलीस पत्रकार कक्षात काही ठराविक पत्रकांना होणार का सर्व पत्रकारांना उपयोग होणार ही पुणे शहरातील पत्रकारांमध्ये चर्चा रंगली आहे. पत्रकार पत्रकार असतो काम शेवटी बातम्या चे सगळे सारखेच असते त्यामुळे न्याय मिळणार का? अशी पुणे क्राईम रिपोर्टर ३० ते ४० वर्षापासून काम करत असणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तांनी पुणे क्राईम पत्रकार कक्षाची आधुनिक पद्धतीने स्थापना केली आहे हे खूप भाग्याची गोष्ट आहे, काही दैनिकाचे पत्रकार ढवळाढवळ करून त्या सगळ्या पत्रकांना उपयोग होणार का अशी प्रतिक्रिया काही पत्रकारांमध्ये व्यक्त केला जात आहे