एरंडोल (जिल्हा जळगाव ) – संपादक शैलेश चौधरी
एरंडोल: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील पिंपळकोठा बु! प्रवासी थांब्यानजिक थांबलेल्या ट्रक ला भरधाव वेगाने येणार्या कार ने जोरदार धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात कारमधील ४जण जागीच ठार झाले तर १जण बालंबाल बचावला. ही दुर्घटना बुधवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडली.मृतांमध्ये ३जण जामडी ता.चाळीसगाव येथील तर १जण वडजी ता.भडगाव येथील असल्याचे सांगण्यात आले.
एम.एच.18 ए.ए.8857 या क्रमांकाचा ट्रक पिंपळकोठा प्रवासी बसथांब्यानजिक उभा असतांना भरधाव वेगाने जाणार्या एम. एच.19 सी.झेड 7360 या क्रमांकाच्या इंडीका कारने धडक दिली.धडक इतकी जबरदस्त होती की, कारमधील 1)चतरसिंग पद्मसिंह परदेशी-चालक 2)विजयसिंग हरी परदेशी3)जयदिप मदनसिंग परदेशी4)आबा रामचंद्र पाटील-वडजी, भडगाव. हे जागीच ठार झाले तर त्यांचा सहकारी रायसिंग पदमसिंह राजपूत -वय 37 हा दैव बलवत्तर होते.
म्हणुन बालंबाल बचावला सदर इसम हा जामडी(चाळीसगाव) येथील पोलीस पाटील आहे. स्थानिक ग्रामस्थांनी झालेल्या भिषण अपघाताचा आवाज ऐकताच त्वरीत घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. दरम्यान ..दोन्हीकडील वाहतुक काहीवेळ ठप्प झाली होती. पोलिस हेड काँन्स्टेबल काशिनाथ पाटील,अनिल पाटील व त्यांच्या सहकार्यांनी वाहतुक सुरळीत केली. मयत जयदिप हा एरंडोल येथील माजी मुख्याध्यापक एम.झेड परदेशी यांचा मुलगा असुन तो एरंडोल ग्रामीण रूग्णालयात फार्मासीस्ट या पदावर कार्यरत होता. परदेशी यांचेसह इतर मृतांच्या नातेवाईकांनी एरंडोल ग्रामीण रूग्णालयात एकच आक्रोश केला.