पुणे शहर पोलिस आयुक्तांनचा’ दणका’ ! एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकास केलं कंट्रोलशी संलग्न ;तर पोलिस कर्मचाऱ्याचं तडकाफडकी निलंबन !

पुणे,दि.२४ :- पुणे शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहरात कुठेही अवैध धंद्ये चालु देऊ नका.तसे आढळल्यास संबंधित पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकावर कठोर कारवाई करण्यात येईल असं काही दिवसांपूर्वी बैठकीत स्पष्ट केलं आहे.व पुणे शहरातील अवैध धंद्यांचं समुळ उच्चाटन करण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्तांनी नामी युक्ती शोधली आहे. दरम्यान, मंगळवारी मुंढवा पोलिस ठाण्यात अवैध धंद्यावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांना 7 दिवसांसाठी पुणे शहर नियंत्रण कक्षाशी संलग्न केलं आहे.मुुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत भिमनगर परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये मटका जुगार खेळताना 4 जण आढळून आले. त्यांच्याकडून सुमारे 4 हजा रूपये जप्त करण्यात आले तर दुसरी कारवाई मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घोरपडीगांव येथील भाजी मार्केटमधील रिकाम्या गाळ्यामध्ये करण्यात आली. तेथे दोन जण जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी तेथून सुमारे एक हजार रूपये जप्त केले.पुणे शहरात कोठेही अवैध धंद्ये सुरू असलेले खपवुन घेतले जाणार नाही हे आयुक्त अमिताभ गुप्ता आणि सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी यापुर्वीच स्पष्ट केले होते. व भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या राजु धोंडीबा वेगरे यांना पोलिस उपायुक्त सागर पाटील यांनी निलंबीत केले आहे. त्याबाबतचे आदेश त्यांनी बुधवारी रात्री उशिरा निर्गमित केले आहेत.अवैध धंद्यांना थारा दिला जाणार नाही. कोठेही अवैध धंद्ये सुरू राहणार नाहीत याबाबत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी यापुर्वीच स्पष्ट केलं आहे. तरी काही पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुलेआम अवैध धंद्ये सुरू आहेत असं निदर्शनास आल्यानंतर संबंधित पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यावर कारवई केली जात आहे. मात्र, वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना महिन्याकाठी मलिदा गोळा करणारे तसेच पोलिस ठाण्याचं महत्वाचं कामकाज बघणारे नामानिराळे रहात होते. मात्र, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात पोलिस कर्मचारी ‘राज वगैरे-वगैरे’ असा उल्लेख एका न्युज चॅनलच्या बातमीमध्ये केला होता. त्यानंतर अति वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी गोपीनियरित्या माहिती घेतली.त्यामध्ये भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील कर्मचारी राजु धोंडीबा वेगरे हे शहरातील अवैध धंद्येवाल्यांशी प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षरित्या संपर्कात असल्याचं निष्पन्न झालं.अति वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी संबंधिताची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते.त्यानंतर पोलिस उपायुक्त सागर पाटील यांनी राजु वेगरे यांना तडकाफडकी निलंबीत केले आहे.

Comments (0)
Add Comment