पुणे महापालिका प्रभाग रचनेच्या हरकतींवर आज झाली सुनावणी

पुणे,दि.२५ :- पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारुप प्रभाग रचनेच्या आराखड्यावर आलेल्या हरकती व सुचनांवर आज (शुक्रवारी) दिवसभर सुनावणी झाली.
राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र , पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ प्रारुप प्रभाग रचना हरकत व सुचना सुनावणी बालगंधर्व रंगमंदिर येथे आज शांततेत संपन्न दि . २५ रोजीची सुनावणी. चोकलिंगम , महासंचालक यशदा , ( राज्य निवडणूक आयोग प्राधिकृत अधिकारी ) , पुणे यांच्या अधिपत्याखाली पार पडली . सदर सुनावणी बालगंधर्व रंगमंदिर , शिवाजीनगर , पुणे ५ येथे सकाळी १० वाजता सुरु झाली . आजच्या सुनावणीमध्ये प्रभाग क्र . २१ ते २६ , ३६ ते ५८ आणि सर्वसाधारण हरकती यांचा समावेश होता . सर्व प्रभागातील एकूण प्राप्त ३५ ९६ हरकतींच्या अनुषंगाने सुनावणी घेण्यात आली . कोविड- १९ च्या अनुषंगाने सर्व शासन नियमांचे काटेकोरपणे पालन करुन सदर सुनावणी कार्यक्रम शांततेत पार पडला . आजी माजी सभासद , राजकीय हरकतदार व नागरिक यांनी हरकती व सुचना दाखल केल्या . सदर सुनावणी प्रसंगी मा . महापालिका आयुक्त विक्रम कुमार , अतिरिक्त महापालिका आयुक्त ( ज ) रविंद्र बिनवडे , अप्पर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे , सचिव राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र दिपक नलावडे ,अप्पर सचिव राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र अतुल जाधव , उप आयुक्त ( निवडणूक ) अजित देशमुख इत्यादी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .

Comments (0)
Add Comment