पुणे शहर पोलिस आयुक्तांच्या गंभीर इशाऱ्यानंतरह

पुणे,दि.२५ :- पुणे शहरात काही ठिकाणी अवैध धंदे सुरु असल्याचे समजल्यावर संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर कारवाईचा इशारा पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत दिल्यानंतरही पुणे शहरातील काही पोलिस ठाण्या हद्दीत मटका व लॉटरीच्या नावाखाली बेटींग घेत असल्याचं समोर आलं.आहे त्यानंतर पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांच्या कार्यालयातील पथकाने या दोन ठिकाणी छापा मारुन तब्बल 32 जणांवर कारवाई केली आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी शहरात अवेध धंद्यांवर तातडीने कारवाई करा, असे आदेश मिटिंगमध्ये दिले होते. त्यानंतर गेल्या आठवड्यात झालेल्या मिटिंगमध्ये त्यांनी पुन्हा या आदेशाची आठवण करुन दिली. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरु असल्याचे आढळून येतील, तेथील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला होता. त्यानंतर त्यांनी कारवाई देखील केलेली आहे.येरवडा परिसरात जुगार सुरु असल्याची माहिती माहिती शनिवारी (दि. 19 फेब्रुवारी) पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांच्या कार्यालयातील पथकाला मिळाली. त्यानुसार या पथकाने तेथे छापा घातला. तेव्हा तेथे तब्बल 19 जण फ्लॅश पत्याचा जुगार खेळत असताना आढळून आले. पोलिसांनी या 19 जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 7 मोबाईल, 14 हजार 340 रुपये रोख असा एकूण 24 हजार 340 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आठवडयाभरापुर्वी झालेल्या कारवाईची चर्चा पोलिस दलात सुरू आहे. अखेर त्या कारवाईची माहिती बाहेर पडलीच.
या कारवाईनंतर विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत महालक्ष्मी लॉन्सजवळ जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती तीन दिवसांपुर्वी उपायुक्त राहिदास पवार यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या जुगार अड्ड्यावर छापा घातला. तेथे 13 जण जुगार खेळताना आढळून आले.त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा 14 हजार 100 रुपयांचा माल जप्त करण्यात आला.परिमंडळ 4 च्या हद्दीत कोठे अवैध धंदे सुरु असल्याची माहिती मिळाल्यास त्यानुसार उपायुक्ताच्या कार्यालयातील पथक तेथे जाऊन कारवाई करत आहे. येरवडा व विमानतळ पोलीस ठाणे यांच्या हद्दीत गेल्या काही दिवसात 2 कारवाया करण्यात आल्या आहेत. यापुढे कोठे अवैध धंदे सुरु असल्याचे समजल्यावर तेथे हे पथक कारवाई करेल, असे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी सांगितले.

Comments (0)
Add Comment