कोल्हापुरकरांना मोठा दिलासा; दुकानांबाबत सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

हायलाइट्स:

  • तब्बल ९० दिवसानंतर कोल्हापुरातील सर्व दुकाने उघडली
  • सरकारने उठवले आठ दिवसासाठी निर्बंध
  • सकाळपासून शहरातील गजबज वाढली

कोल्हापूरः करोना पॉझिटिव्हिटी दर जादा असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात निर्बंध कायम ठेवण्यात आले होते. निर्बंधांमुळं गेल्या तीन महिन्यांपासून व्यापाऱ्यांनी दुकानं बंद होती. मात्र, आज तब्बल ९० दिवसांनंतर सर्व दुकानं उघडण्यात आली आहे. आठ दिवसांसाठी शहरातील निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळं नागरिकांबरोबरच व्यापाऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

कोल्हापुरातील निर्बंध जैसे थे ठेवल्यामुळं व्यापाऱ्यांनी निर्बंध हटवण्याची मागणी केली होती. प्रशासन आणि व्यापाऱ्यांच्यात वादही झाले होते. त्यानंतर प्रशासनानं मध्यममार्ग काढत आठ दिवसांसाठी निर्बंध उठवले आहेत. तसंच, आठ दिवसांनंतर करोनाची परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

करोनाच्या संकटकाळातही लाचखोरीची लाट कायम

गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात करोनाचा कहर कायम आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेटही अधिक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं निर्बंध कायम ठेवले होते. दुपारी चार वाजेपर्यंत केवळ जीवनावश्यक दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात व्यापारी संघटनांनी विरोध केला होता. सोमवारी सकाळपासून दुकान उघडण्याचा निर्धार व्यापाऱ्यांनी केला होता. व्यापाऱ्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनानं यावर मध्यममार्ग काढला आहे.

रामदास आठवलेंच्या सल्ल्यावर देवेंद्र फडणवीसांचे मिश्किल उत्तर; म्हणाले…

व्यापाऱ्यांच्या मागणीला यश आलं आहे. आजपासून आठ दिवस कोल्हापुरातील सर्व दुकानं उघडण्यात येणार आहेत. त्यानंतर जिल्ह्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे.

Source link

Kolhapur lockdownKolhapur newskolhapur shopsकोल्हापूर दुकानंकोल्हापूर लॉकडाऊन
Comments (0)
Add Comment