मृत नीलगाय खाल्ल्याने बिबट्याचा मृत्यूृ; प्राणीमित्रांना ‘ही’ शंका

हायलाइट्स:

  • मृत नीलगाय खाल्ल्यानं जळगाव तालुक्यात बिबट्याचा मृत्यू
  • हा मृत्यू नसून शिकार असल्याचा वन्यजीव संरक्षण संस्थेचा आरोप
  • वन विभागाकडून प्रकाराची चौकशी सुरू

जळगाव: तालुक्यातील विटनेर शिवारात सोमवारी मृत बिबट्या आढळून आला. मृत नीलगाय खाल्ल्यामुळे बिबट्याचा मृत्यू झाला असल्याचा आरोप वन्यजीव संरक्षण संस्थेने केला आहे. याबाबत चौकशीची मागणी देखील करण्यात आली आहे. (Leopard dies after eating Nilgai)

जळगाव तालुक्यातील विटनेर शिवारात ज्या ठिकाणी बिबट्याच्या मृतदेह आढळून आला आहे, त्या ठिकाणापासून १० मीटर अंतरावर एक नीलगाय अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत मृत आढळून आली आहे. विटनेर शिवारातील कंपार्टमेंट ४३८ या ठिकाणी हा मृतदेह आढळून आला आहे.

वाचा: चिंता वाढली! राज्यात म्युकरमायकोसिसचे एक हजार बळी

बिबट्याला मारण्याच्या उद्देशानेच मृत नीलगाईवर विषाचा वापर करण्यात आल्याचा अंदाज वन विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. घटनास्थळी पशुधन विकास अधिकारी डॉ. जयलाल राठोड, डॉ. राहुल ठाकूर, श्रीकांत व्यवहारे, विवेक देसाई, चिमाजी कांबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी समाधान पाटील जाऊन पाहणी केली आहे. या ठिकाणी मृत असलेल्या बिबट्या व नीलगाय यांचे व्हीसेराचे नमुने जमा करण्यात आले आहे. याबाबत पुढील चौकशी वन विभागाने सुरू केली आहे. विषाच्या साह्याने बिबट्याची हत्या करण्यात आली असल्याने वन अधिकाऱ्यांसह इतरांची देखील चौकशी करण्याची मागणी वन्यजीव प्रेमींकडून केली जात आहे.

वाचा: पावसानं दडी मारल्यामुळं जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर संकट

Source link

jalgaon news in marathiLeopard dies after eating NilgaiNilgaiजळगावमृत नीलगाय खाल्ल्यानं बिबट्याचा मृत्यू
Comments (0)
Add Comment