पारोळा येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडीत ६ते७ लाखांचा ऐवज लंपास..!


पारोळा: येथे दोन उच्चभ्रू वसाहतीत भर दिवसा दोन घरे फोडून किमान ६ ते ७ लाखांची चोरी झाल्याने खळबळ माजली आहे.
या बाबत मिळालेल्या माहिती नुसार येथील जगमोहनदास नगर मधील जिल्हा बँकेचे कर्मचारी रवींद्र दौलतराव पाटील हे ५एप्रिल २०२२ मंगळवार रोजी सकाळी ११ वाजता आपल्या बँकेच्या कामकाजानिमित्त घरातुन निघुन गेले.
त्यांच्या पत्नी सुनीता पाटील ह्या एन.ई.एस हायस्कुल येथे कर्तव्यास असून त्या ही दुपारी ३वाजता शाळेत गेलेल्या होत्या त्या ठीक ५ वाजता घरी परतल्या असता घराचा दरवाजा उघडा आढळला व कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आल्याने त्यांनी आपल्या पतीस घरात चोरी झाल्याची माहिती दिली.
यावेळी घरातील दोन्ही बेडरूम मधील गोदरेज कपाटे फोडून त्यातील एक ५२ग्राम वजनाची ची सोन्याची चेन तसेच २२ ग्राम चे सोन्याचे दागिने ,चांदीचा ग्लास व काही चांदीचे तुकडे असा किमान ४ लाखाचा ऐवज चोरी झाल्याचे समजले.
तर दुसऱ्या घटनेत याच वसाहती च्या पुढे उंदिरखेडा रस्त्यावरील वर्धमान नगर मध्ये मणिपूर येथे सैन्यदलात असलेले प्रकाश नामदेव पाटील मूळ रा. खोरदड ता. धुळे हे आपली पत्नी वैशाली सोबत ४एप्रिल २०२२ सोमवार रोजी राहत्या घराला कुलूप लावून पाचोरा येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते.
हे कुटुंबिय मंगळवारी सकाळी ५वाजता घरी परतले असता त्यांना घराचे कुलूप तोडलेले दिसल्याने त्यांना चोरी झाल्याची शंका आली. यावेळी त्यांनी घरात पाहिले असता गोदरेज कपाट फोडून त्यातील सोन्याचे दागिने,चांदीचे तुकडे असा किमान दीड ते दोन लाखांचा ऐवज चोरून नेल्याचे आढळले.विशेष म्हणजे या दोन्ही वसाहतींमध्ये नेहमी वर्दळ असते.त्यात जवळ जवळ घरे असताना भर दिवसा घरे फुटल्याने या बाबत आरोपीने सदर घरावर पाळत ठेऊन भर दुपारी आपले काम फत्ते केले असल्याचे लक्षात येते.

Comments (0)
Add Comment