हायलाइट्स:
- नारायण राणेंच्या केंद्रातील मंत्रिपदामुळे शिवसेनेला धोका?
- विनायक राऊतांनी दिली पहिली प्रतिक्रिया
- ‘कोकण म्हणजे शिवसेना हे समीकरण कायम राहिल’
सिंधुदुर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आज होणार असून यामुळे राज्यात राजकीय खळबळ सुरू आहे. नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी निश्चित झाली असून ते आज दिल्लीत शपथ घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. खरंतर, राज्यात शिवसेनेला उत्तर देण्यासाठी नारायण राणेंची निवड केली देली अशा चर्चा असताना शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेला यापूर्वी सर्वांनी अनुभवलं आहे. कोकण म्हणजे शिवसेना हे समीकरण आहे. ते कायम राहिल. कुणाच्याही मंत्रीपदामुळे त्यामध्ये काहीही फरक होणार नसल्याचं शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंच्या मंत्रिपदावर म्हटलं आहे.
तसेच, ईडीचा वापर हा आकसापोटी होत आहे. स्वातंत्र्यानंतर अशा प्रकारे वापर करणारे हे पहिलंच सरकार असल्याची टीका देखील विनायक राऊत यांनी केली आहे. एकनाथ खडसे यांच्या जावयाला झालेल्या अटकेप्रकरणी प्रश्न विचारल्यानंतर ते बोलत होते.
दरम्यान, रिफायनरीच्या नवीन जागेबाबत अद्याप काहीही प्रस्ताव नाही. लोकांना नको असेल तर हा प्रकल्प होणार नाही. शिवाय, कुणावर तरी गोळ्या झाडून हा प्रकल्प करणार आहात का? असा सवाल देखील राऊत यांनी नारायण राणे यांच्या नावाचा उल्लेख करत केला आहे.
नारायण राणे दिल्लीत…
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्या दिल्लीतील कार्यालयातून ५ जुलै रोजी फोन आला होता. त्याचवेळी नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागल्याची निश्चिती झाली. यामुळे नारायण राणे पत्नी नीलम यांच्यासह दिल्लीत आहे.