आता आम्हाला शाळेत जाउद्या..

शैलेश चौधरी (जळगाव जिल्हा विशेष प्रतीनिधी)एरंडोल:कोरोना व लॉकडाऊन च्या काळात आम्हाला प्रदिर्घ सुटी मिळाली,एरवी आम्हाला सुटी मिळाल्याचा जो आनंद व्हायचा त्या ऐवजी वर्ष-दिडवर्षाच्या सुटीमुळे जाम वैताग आला म्हणून आता आम्हाला शाळेत जाऊद्या..
अशी आर्त हाक विद्यार्थीवर्गाकडून देण्यात येत आहे.
एरंडोल तालुक्यात सर्वांनाच ऑनलाइन शिक्षण प्रणालीद्वारे अध्यापन केले जात आहे परंतू ही प्रणाली तात्पुरती मलमपट्टी असून खरे व प्रभावी शिक्षण वर्गांमध्येच दिले जाते.
दरम्यान ऑनलाइन शिक्षण प्रणाली चा सुध्दा विद्यार्थ्यांना कंटाळा आला असून त्यांना शाळेची ओढ लागली आहे म्हणून शासनाने शाळा व महाविद्यालयांची दालने तात्काळ उघडावीत अशी विद्यार्थी पालकांची अपेक्षा आहे.

Comments (0)
Add Comment