दुचाकी वाहने चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना Pune पोलिसांनी अटक केली

तेज पोलीस टाइम्स = परवेज शेख

दुचाकी वाहने चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली

असून त्याच्याकडील एकूण १५ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहिती नुसार लोणीकंद पोलिस ठाणे येथे वाहन चोरीचा गुन्हा दाखल झाला होता त्यावरून  लवकरात लवकर आरोपींचा शोध घेऊन या चोरांना आळा बसावा  यासाठी लोणीकंद पोलीस यांच्याकडील वाहनचोरीचा गुन्हा करणा-या आरोपींच्या बाबत युनिट ६ पथकाला माहिती मिळाल्याने वरिष्ठांच्या परवानगीने सदरचा गुन्हा हा तपासकामी गुन्हे शाखा,युनिट-६ कडे वर्ग करुन घेण्यात आला.

नमुद गुन्हयाचा तपास करत असताना दिनांक २९/०४/२०२२ रोजी नमूद गुन्हा करणारे आरोपी हे वाघोली बाजारतळ येथे येणार असल्याची बातमी पोलिस पथकास मिळाली होती.सदरबाबत श्री गणेश माने,पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, युनिट ६, पुणे शहर व त्यांच्या पोलीस पथकाने वाघोली बाजारतळ येथे सापळा रचून १) निलेश बाळासाहेब शिवरकर, वय ३३ वर्षे, रा. म्हातोबाची आळंदी, पानमळा, ता. हवेली, जि. पुणे व २) प्रशांत संपत चव्हाण, वय ३४ वर्षे, रा. निमगाव म्हाळुगी, ता. शिरुर, जि. पुणे यांना त्यांच्याकडील मोटार सायकलसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडील मोटार सायकलबाबत त्यांच्याकडे तपास करता त्यांनी ती मोटार सायकल ही आळेफाटा येथून चोरून आणल्याचे कबुल केल्यामुळे त्यांना अटक करून मा. न्यायालयात हजर करून त्यांची दिनांक ०३/०५/२०२२ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त करण्यात आली होती पोलीस कोठडी दरम्यान त्यांच्याकडे तपास करता त्यांनी पुणे शहरामधील विविध ठिकाणाहून मोटार सायकली चोरी केल्याचे सांगितले. त्यांच्याकडून एकूण तीन लाख रूपये किंमतीच्या एकूण १५ मोटार सायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांच्याकडून एकूण १५ वाहनचोरीचे गुन्हे उघड करण्यात आले आहेत.

सदरची उल्लेखनिय कामगिरी ही मा.पोलीस आयुक्त,पुणे शहर,श्री.अमिताभ गुप्ता, मा.पोलीस सह आयुक्त,श्री.संदिप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त,गुन्हे,श्री.रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप आयुक्त,गुन्हे शाखा,श्री.श्रीनिवास घाडगे, मा.सहा.पोलीस आयुक्त, गुन्हे-२,श्री नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा,युनिट- ६ चे पोलीस निरीक्षक,श्री.गणेश माने, सहा. पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन शिंदे, ऋषीकेश टिळेकर, शेखर काटे, प्रतिक लाहिगुडे, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषीकेश ताकवणे, नितीन धाडगे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.

Comments (0)
Add Comment