कामाची दखल घेत देण्यात आलं सर्वत्कृष्ठ पोलीस महासंचालक पदक

तेज पोलीस टाइम्स = परवेज शेख

पुण्यातील पोलीस खात्यातील युनिट 1 मध्ये काम करणाऱ्या अमोल पवार यांनी पोलीस दलात केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन मा.पोलीस महासंचालक यांनी पवार यांना पोलीस महासंचालक पदक बहाल केले.

यावेळी पुण्याचे मा.पोलीस आयुक्त श्री अमिताभ गुप्ता सर यांच्या हस्ते हा पदक देण्यात आला यावेळी मा.पोलीस सहआयुक्त श्री संदीप कर्णिक हे देखील उपस्थित होते.

अमोल पवार शहरात आत्ता पर्यंत 40 पेक्षा अधिक घरफोडी कारवाई तसेच 30 पेक्षा अधिक वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणि 56 पिस्तुल च्या कारवाई व मोक्क्यातील 12 गुन्हेगारांना अटक तसेच 12 खुन्हाचे गुन्हे उघडकीस आणण्यास पवार यांनी मोठ्या प्रमाणत मेहनत घेतली आहे.शिवाय पोलीस दलात काम करताना 200 पेक्षा जास्त बक्षिसे देखील अमोल पवार यांना मिळाली आहे.त्यांच्या या कामगिरीची पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी देखील दखल घेत त्यांना शाबासकीची थाप दिली आहे.

Comments (0)
Add Comment