काँग्रेस नेत्यांमधील वादाची चर्चा; नाना पटोलेंनी दिलं स्पष्टीकरण

हायलाइट्स:

  • काँग्रेस नेत्यांमध्ये अंतर्गत कलह सुरू असल्याची चर्चा
  • नाना पटोलेंनी फेटाळल्या काँग्रेसमधील मतभेदाच्या चर्चा
  • भाजपवरच साधला जोरदार निशाणा

पुणे : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून पुन्हा अंतर्गत वाद रंगत असल्याची चर्चा आहे. विधानसभा अध्यक्षपदावरुन पक्षात स्पर्धा सुरू असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात बोलत असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress Nana Patole) यांनी या चर्चांबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

‘काँग्रेसमध्ये कोणताही अंतर्गत कलह नाही. काँग्रेसचे नेते दिल्लीला जात असल्यावरुन प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पण बैठकीसाठी सर्वांनाच दिल्लीला जावं लागतं. अंतर्गत वादाचंच बोलाल तर नुकतंच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी साखर कारखान्यांतील घोटाळ्यांबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं आहे आणि या पत्रात भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्या कारखान्याचंही नाव आहे. ते तुम्ही आधी बघा,’ असं म्हणत नाना पटोले यांनी भाजपमधील स्थितीबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

कसलं पुनर्वसन? माझं घर वाहून गेलेलं नाही: पंकजा मुंडे

‘स्वबळाचा निर्धार कायम’

राज्यातील काँग्रेसची नेते मागील काही दिवसांपासून स्वबळाचा नारा देत आहेत. महापालिका निवडणुकांसह आगामी विधानसभा निवडणुकाही स्वबळावर लढवल्या जातील, असा दावा या नेत्यांकडून करण्यात येतो. त्यामुळे काँग्रेसच्या काही नेत्यांनी स्वबळाचा नारा देणाऱ्या मंत्र्यांची तक्रार दिल्ली दरबारी केल्याची चर्चा झाली होती. या पार्श्वभूमीवर आता नाना पटोले यांनी पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्वबळाचा निर्धार कायम असल्याचं म्हटलं आहे. मात्र त्यांनी आगामी महापालिका निवडणुका आणि विधानसभा निवडणुका याबाबत भाष्य करणं टाळलं आहे.

‘स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसचा स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्धार कायम आहे. महापालिका निवडणुकांमध्ये योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल,’ असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भाजपकडून व्यवस्था उद्धवस्त केली जात असून ईडी आणि सीबीआय या संस्थांना ‘चिल्लर’ केले आहे, असा घणाघातही यावेळी नाना पटोले यांनी केला.

Source link

CongressNana Patoleकाँग्रेसनाना पटोलेपुणे न्यूजभाजप
Comments (0)
Add Comment