दिल्ली (प्रतिनिधी)-आज दिल्लीत राष्ट्रीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर काळकुटे पाटील यांनी ना.भारतीताई पवार, आरोग्य राज्यमंत्री भारत सरकार, नवी दिल्ली यांची महाराष्ट्र राज्यातील लहान मुलांचे लसीकरण तात्काळ करणे व १८ ते ४५ वयाच्या व्यक्तींचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी तात्काळ लस पुरवठा उपलब्ध करून देण्या संदर्भात भेट घेऊन निवेदन दिले.
कोरोना ची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील लहान मुलांचे लसीकरण तात्काळ करणे गरजेचे आहे. लहान मुलांचे लसीकरण तात्काळ सुरु करण्यासाठी आपण तात्काळ प्रयत्न करावेत तसेच लसीकरणानंतर शाळा सुरू होतील व शैक्षणिक क्षेत्रातील होणारे नुकसान थांबेल तसेच १८ ते ४५ वयोगटातील व्यक्तींचे उर्वरित सर्व लसीकरण पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त लसीचा साठा उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी मागणी राष्ट्रीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर काळकुटे पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे